सांडपाणी व्यवस्थापनाचा ९२ लाखांचा निधी पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:10 IST2021-06-29T04:10:19+5:302021-06-29T04:10:19+5:30
अमरावती : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता, ग्रामीण पाणीपुरवठा आणि रोजगार हमी योनजा या तीन विभागाच्या माध्यमातून जिल्हाभरातील ...

सांडपाणी व्यवस्थापनाचा ९२ लाखांचा निधी पडून
अमरावती : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता, ग्रामीण पाणीपुरवठा आणि रोजगार हमी योनजा या तीन विभागाच्या माध्यमातून जिल्हाभरातील ५१ ग्रामपंचायतींमध्ये सांडपाणी व्यवस्थापनासाठीची प्रक्रिया राबवायची आहे. याकरिता पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ९२ लाखांचा पहिला हप्ताही उपलब्ध करून दिला. मात्र, तीन विभागात समन्वय नसल्याने हा निधी नियोजन व त्यानंतर कामांसाठी करावयाच्या निविदा या सर्व प्रकारांमुळे पडून राहिला. परिणामी सांडपाणी व्यवस्थापनाची प्रक्रिया केवळ प्रशासनातील अधिकाऱ्याच्या बेजबाबदारपणामुळे खोळंबाल्याची बाब समोर आली आहे.
ग्रामपंचायती समृध्द करण्यासाठी जागतिक बँक सहायता निधीतून जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. या निधीतून सांडपाणी तसेच घनकचरा व्यवस्थापनाची कामे अपेक्षित आहे. हा प्रकल्प स्वच्छ भारत मिशन, रोजगार हमी योजना आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभाग अशा तीन विभागांच्या समन्वयातून पूर्ण करावयाचा आहे. त्यातही स्वच्छ भारत मशिनकडून ९२ लाखांचा निधी वर्ग केला आहे. मात्र कामांची निविदा प्रक्रियेची जबाबदारी असलेल्या पाणीपुरवठा विभागाकडून यावर कारवाई होत नसल्याने लाखो रुपयांचा निधी पडून आहे.
बॉक्स
कृती आराखड्यातील गावांची संख्या
तालुका गावे संख्या रक्कम
अचलपूर ०५ ११ लाख ५५ हजार ८२६
अमरावती ०३ ०३ लाख ४० हजार ६४
अंजनगाव सुजी ०५ १०लाख १० हजार ४३
भातकुली ०४ १० लाख १९ हजार ४४२
चांदूर बाजार ०४ १० लाख ०१हजार ६०,
चांदूर रेल्वे ०३ ०४ लाख ८० हजार १७७
चिखलदरा ०५ ०५ लाख ०५ हजार ५११
दर्यापूर ०३ ०५ लाख ४२ हजार १२२
धामणगाव रेल्वे ०५ ०६ लाख ९७ हजार ६१७
धारणी ०२ ०१ लाख ७६ हजार २२६
मोशी ०४ ०८ लाख २५ हजार ७४४
नांदगाव खंडे. ०३ ०५ लाख ६७ हजार ८४५
तिवसा ०१ ०२ लाख १७ हजार २८२
वरूड ०५ ०६ लाख ६० हजार ९४१