हातुर्णा येथे ९० वर्षीय महिलेची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:09 IST2021-01-01T04:09:33+5:302021-01-01T04:09:33+5:30

वरुड: तालुक्यातील हातुर्णा येथील ९० वर्षीय महिलेची दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने काठीने व लाथाबुक्यांनी मारहाण करून ...

90-year-old woman killed in Haturna | हातुर्णा येथे ९० वर्षीय महिलेची हत्या

हातुर्णा येथे ९० वर्षीय महिलेची हत्या

वरुड: तालुक्यातील हातुर्णा येथील ९० वर्षीय महिलेची दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने काठीने व लाथाबुक्यांनी मारहाण करून हत्या करण्यात आली. २८ डिसेंबर रोजी ही घटना घडली. आलोकाबाई रामटेके (९०) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी खुशाल ऊर्फ छोटू माहुरे (१९, हातुर्णा) याला अटक करण्यात आली.

बेनोडा पोलिसानुसार, आलोकाबाई या एकट्याच राहत होत्या. घटनेच्या दिवशी आरोपी खुशालने वृद्धेला दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, पैसे न दिल्याने तिला काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांना माहिती देण्यात आली. एसडीपीओ कविता फरतडे यांनी तपासाची सूत्रे हाती घेत आरोपीची शोध चालविला. अखेर बहादा येथून आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. न्यायालयाने त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

------

Web Title: 90-year-old woman killed in Haturna