संरक्षित ९६ कोटी, भरपाई १५ कोटीच

By Admin | Updated: March 13, 2015 00:19 IST2015-03-13T00:19:58+5:302015-03-13T00:19:58+5:30

खरीप २०१४ च्या हंगामात अपुऱ्या पावसामुळे सोयाबीन, कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पीक विम्याचा हप्ता भरणाऱ्या शेतकऱ्यांना या हप्त्याच्या कित्येकपट कमी भरपाई मिळाली.

9 crore crores, compensation up to 15 crores | संरक्षित ९६ कोटी, भरपाई १५ कोटीच

संरक्षित ९६ कोटी, भरपाई १५ कोटीच

गजानन मोहोड अमरावती
खरीप २०१४ च्या हंगामात अपुऱ्या पावसामुळे सोयाबीन, कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पीक विम्याचा हप्ता भरणाऱ्या शेतकऱ्यांना या हप्त्याच्या कित्येकपट कमी भरपाई मिळाली. जिल्ह्यात अधिसूचित पिकाकरिता ३७ हजार ९३३ शेतकऱ्यांनी ४७४३०.९९४ हेक्टर क्षेत्राच्या विम्याकरिता ९०८.८७ लाखांचा भरणा करून ९६२८.१६ लाख विम्याचे संरक्षण केले. प्रत्यक्षात विम्याची भरपाई ही १५२४.२६ लाख रूपये इतकी देण्यात येत आहे.
अपुरा पाऊस, पावसातील खंड व अतिपाऊस या तीन हवामान घटकांच्या धोक्यापासून पिकांना संरक्षण देणारी हवामान आधारित पीकविमा योजना खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन व कापूस या पिकासाठी पथदर्शक स्वरुपात राबविण्यात आली. पिकांच्या नुकसानीच्या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे हा त्यामागचा उद्देश होता. विविध वित्तीय संस्थांकडून अधिसूचित पिकासाठी पीककर्ज घेणाऱ्या सर्व कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना सक्तीची करण्यात आली. बिगर कर्जदार क्षेत्रासाठी ऐच्छिक होती.

Web Title: 9 crore crores, compensation up to 15 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.