न्यायासाठी ८५ वर्षीय वृृध्देची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:15 IST2021-09-21T04:15:17+5:302021-09-21T04:15:17+5:30

शेख बशीर शेख लाल यांनी न्यायालय व उपविभागीय महसूल कार्यालयात दाखल केलेली प्रकरणे खारिज करण्यात यावीत, आपल्याविरूद्ध नोंदविलेले गुन्हे ...

85-year-old struggles for justice | न्यायासाठी ८५ वर्षीय वृृध्देची धडपड

न्यायासाठी ८५ वर्षीय वृृध्देची धडपड

शेख बशीर शेख लाल यांनी न्यायालय व उपविभागीय महसूल कार्यालयात दाखल केलेली प्रकरणे खारिज करण्यात यावीत, आपल्याविरूद्ध नोंदविलेले गुन्हे खारिज करण्यात यावे, उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून दोषी असलेल्या सर्व अधिकारी कर्मचार्यांवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी गुलाब बी शेख रशिद (८५, धारणी) व रूखसाना परविन शेख शहजाद (५६, असिर कॉलनी, अमरावती) यांनी केली आहे.

दोघींनी १८ मार्च १९९७ रोजी शेख बशिरकडून १ हेक्टर ६२ आर जमीन खरेदी केली. त्या जमिनीचा एनए देखील करण्यात आला. मात्र, शेख बशीर याने सन २०१९ मध्ये त्या विकलेल्या जागेबाबत एसडीओंकडे प्रकरण दाखल केले. त्यापुढी जाऊन दोन्ही महिलांविरूद्ध धारणी पोलिसांत फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले. सबब, दोन्ही महिला आता स्वत:च्या निर्दोषत्वासाठी झटत आहेत.

Web Title: 85-year-old struggles for justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.