८० लाखांचे पम्पिंग मशीन भंगार अवस्थेत
By Admin | Updated: October 8, 2015 00:13 IST2015-10-08T00:13:50+5:302015-10-08T00:13:50+5:30
सन १९९६ मध्ये सिंचन विभागात २२ कोटींचा घोटाळा उघडकीस आला होता. त्यावेळी पाणी पुरवठा विभागाने ८० लाख रुपयांचे पम्पिंग मशिन खरेदी केले होती.

८० लाखांचे पम्पिंग मशीन भंगार अवस्थेत
२० वर्षांपासून धूळ खात : जि.प.चा बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर
मनीष कहाते अमरावती
सन १९९६ मध्ये सिंचन विभागात २२ कोटींचा घोटाळा उघडकीस आला होता. त्यावेळी पाणी पुरवठा विभागाने ८० लाख रुपयांचे पम्पिंग मशिन खरेदी केले होती. या घोटाळ्याची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे होती. या विभागाने पंपींग मशीनच्या वापराबाबत नाहरकत पत्र दिल्यानंतरही पाणी पुरवठा विभागाने हे मशिन उपयोगात न आणल्याने ते भंगार अवस्थेत पडून आहे.
पाणी पुरवठा विभाग आणि सिंचन विभाग पूर्वी एकत्र होते. त्यामुळे सन १९९६ साली ८० लाख रुपये खर्च करुन पंपींग मशिन खरेदी करण्यात आले होते. परंतु सिंचन विभागाचा घोटाळा उघडकीस आल्याने मशिन गोदामात तेव्हापासून तसेच पडून होते. याप्रकरणाची चौकशी पूर्णझाल्यानंतर व संबंधित विभागाने आदेश दिल्यानंतर हे यंत्र उपयोगात आणायला हवे होते. परंतु पाणी पुरवठा विभागाच्या निष्काळजीपणामुळे अद्यापही हे मशिन भंगार अवस्थेत पडून आहे. जिल्हा परिषदेच्या बेजबाबदार कारभारामुळे महागड्या यंत्राची पार विल्हेवाट लागली आहे. बेपर्वा धोरणामुळे लाखो रुपयांची सामुग्री धुळखात पडली आहे.