८० लाखांचे मोबाईल जप्त

By Admin | Updated: July 9, 2014 23:11 IST2014-07-09T23:11:52+5:302014-07-09T23:11:52+5:30

महापालिकेच्या स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभागाने ८० लाखांचे मोबाईल जप्त केले. शहरात आणल्या जात असलेल्या या मोबाईल्सचे मूळ बिल बनावट असल्याचा संशय आल्यानंतर एलबीटी बुडवून हा माल

80 lakh mobile phones seized | ८० लाखांचे मोबाईल जप्त

८० लाखांचे मोबाईल जप्त

एलबीटी विभागाची कारवाई : बिल बनावट असल्याचा संशय
अमरावती : महापालिकेच्या स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभागाने ८० लाखांचे मोबाईल जप्त केले. शहरात आणल्या जात असलेल्या या मोबाईल्सचे मूळ बिल बनावट असल्याचा संशय आल्यानंतर एलबीटी बुडवून हा माल शहरात आणल्या जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर एलबीटी विभागाने बुुधवारी ही कारवाई केली. मोबाईल आणणारे टाटा एस कंपनीचे एम.एच.४० वाय ८४५६ हे वाहनही जप्त करण्यात आले..
बडनेरा मार्गालगतच्या गुलशन प्लाझासमोर उपरोक्त वाहन उभे होते. वाहनातील मोबाईलबाबत एलबीटी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिलाची मागणी केली. तेव्हा राज डिस्ट्रीब्युटर, दाभा या नावे बिल असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले. यवतमाळ मार्गालगत दाभा हे गाव असून या ठिकाणी राज डिस्ट्रीब्युटर नामक कोणतेही प्रतिष्ठान नाही. त्यामुळे आयुक्त अरुण डोंगरे यांच्या आदेशानुसार हे वाहन मोबाईलसह ताब्यात घेण्यात आले. या घटनेवरून एलबीटी बुडविण्यासाठी सर्रास चोरट्या मार्गाचा वापर सुरू असल्याचे स्पष्ट होते. गेल्या दोन वर्षातील ८० लाख रुपयांचा माल पकडण्याची ही पहिलीच घटना आहे. एलबीटी बुडविण्यासाठी अनेक व्यापाऱ्यांनी महापालिका हद्दीच्या बाहेर दुकाने थाटली आहेत.
व्यापाऱ्यांमध्ये दहशत
मात्र शहरात बनावट नावाने माल आणून मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचे चित्र आहे. काही महिन्यापासून व्यापाऱ्यांनी एलबीटी भरण्याकडे पाठ फिरविली आहे. कर न भरता व्यवसाय करने ही व्यापाऱ्यांची मानसिकता तयार झाल्याने महापालिकेचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत आहे.
८० लाखांचे मोबाईल जप्त करुन ते पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. राज डिस्ट्रीब्युटर नेमके कोणाच्या मालकीचे आहे. याचा तपास करण्यासाठी एलबीटी विभागाने सुत्रे फिरविली आहे. शहरात एलबीटी न भरता दर दिवसाला लाखो रुपयांचा माल येत असल्याचा संशायावर बुधवारी जप्त करण्यात आलेल्या मालावरुन स्पष्ट होते.
ही कारवाई उपायुक्त विनायक अवघड यांच्या मार्गदर्शनात एलबीटी अधीक्षक सुनील पकडे, श्रीराम आगासे, दुर्गादास मिसळ, रुपेश गोलाईत, प्रशांत राउत यांनी केली आहे.

Web Title: 80 lakh mobile phones seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.