जिल्ह्यात 11 महिन्यात 8 लाख रुग्ण तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 05:01 IST2021-12-29T05:00:00+5:302021-12-29T05:01:02+5:30

जिल्ह्यात एकूण ११ शासकीय रुग्णालये आहेत. यामध्ये औषधोपचार, शस्त्रक्रिया, बालकांवरील उपचार, प्रसूती, स्त्री वंध्यत्व, हाडाच्या शस्त्रक्रिया, क्षयरुग्णावरील उपचार, मनोरुग्ण, अतिदक्षता विभागात दाखल रुग्णांवर तातडीचा उपचार, श्वानदंश, सर्पदंश, अन्य दंशाच्या रुग्णांवर उपचार, डोळे, दात त्वचा किडनी निकामी झाल्याने डायलिसीस, विषबाधा झालेल्या व सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखीच्या पुरुष व महिला रुग्णांवर उपचार करण्यात आला आहे.

8 lakh patients examined in 11 months in the district | जिल्ह्यात 11 महिन्यात 8 लाख रुग्ण तपासणी

जिल्ह्यात 11 महिन्यात 8 लाख रुग्ण तपासणी

इंदल चव्हाण 
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात ३९९८९५ पुरुष व ४०४२०९ महिलांची बाह्यरुग्ण तपासणी करण्यात आली. यामध्ये ९२ हजार २० रुग्णांना दाखल करून विविध आजारांवर औषधोपचार करण्यात आला.
जिल्ह्यात एकूण ११ शासकीय रुग्णालये आहेत. यामध्ये औषधोपचार, शस्त्रक्रिया, बालकांवरील उपचार, प्रसूती, स्त्री वंध्यत्व, हाडाच्या शस्त्रक्रिया, क्षयरुग्णावरील उपचार, मनोरुग्ण, अतिदक्षता विभागात दाखल रुग्णांवर तातडीचा उपचार, श्वानदंश, सर्पदंश, अन्य दंशाच्या रुग्णांवर उपचार, डोळे, दात त्वचा किडनी निकामी झाल्याने डायलिसीस, विषबाधा झालेल्या व सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखीच्या पुरुष व महिला रुग्णांवर उपचार करण्यात आला आहे. यातील १ लाख १३ हजार ३९० पुरुष व १ लाख ७६६ महिला रुग्ण अशा एकूण २ लाख १४ हजार १५६ पुरुष व ५११३ रुग्णावर व्हायरल फिव्हरचा उपचार करण्यात आल्याची माहिती जिल्हा वैद्यकीय सूत्रांनी दिली. 

डोळ्यांची निगा कशी राखाल?
डोळे हे शरीराचे अत्यंत महत्त्वाचे अवयव असून, त्यांची निगा राखणे गरजेचे आहे. रोज सकाळी कोमट पाण्याने धुऊन साफ करावे, असे डॉ. नम्रता सोनोने यांनी सांगितले.

१६८८६ प्रसूती
जिल्हा स्त्री रुग्णालयासह १४ तालुक्यातील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात ११ महिन्यात १६८८६ महिलांची प्रसूती झाली. ७६५९ महिलांवर वंध्यत्वावर उपचार करण्यात आले. तसेच १०९४५ बालकांवर औषधोपचार केल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

सन २०२१ मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयात २ लाख १४ हून अधिक रुग्णांची ओपीडी झाली. यात सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, डोळ्यासंबंधित रुग्णांचा सर्वाधिक समावेश आहे. ७६०० शस्त्रक्रिया झाल्यात.
- डॉ. श्यामसुंदर निकम, 
जिल्हा शल्यचिकित्सक

 

Web Title: 8 lakh patients examined in 11 months in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य