आरटीईसाठी दुसऱ्या दिवसापर्यंत ७७४ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:14 IST2021-03-05T04:14:07+5:302021-03-05T04:14:07+5:30
अमरावती : आरटीई प्रवेशाच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला बुधवारपासून प्रारंभ झाला. अर्ज प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवार, ४ मार्च ...

आरटीईसाठी दुसऱ्या दिवसापर्यंत ७७४ अर्ज
अमरावती : आरटीई प्रवेशाच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला बुधवारपासून प्रारंभ झाला. अर्ज प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवार, ४ मार्च रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत ५७४ पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरिता अर्ज संकेस्थळावर दाखल केले. विशेष म्हणजे आरटीई प्रवेशाच्या अर्ज प्रक्रियेला पालकांचा प्रतिसाद वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून आले.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा अर्थात आरटीई अंतर्गत २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला बुधवार, ३ मार्चपासून प्रारंभ झाला. अर्ज प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी दुपारी ४ वाजेपर्यंत ५७५ अर्ज दाखल करण्यात आले होते.
शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांत २५ टक्के जागा आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत जिल्ह्यातील २४४ खासगी शाळांनी नोंदणी केली. या शाळांमध्ये २०७६ जागा उपलब्ध राहणार आहेत. दरम्यान पालकांना ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी २१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लॉटरी निघण्याची शक्यता असून, त्यानंतर प्रवेश निश्चित वेळापत्रक जाहीर होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
बॉक्स
आवश्यक कागदपत्रे
३१ डिसेंबर २०२१ पर्यंत सहा वर्ष पूर्ण होणाऱ्या बालकांना आरटीई अंतर्गत प्रवेश घेता येणार आहे. त्याचा पत्ता असलेला पुरावा, जन्माचा दाखला, बालक वंचित घटकातील असल्यास जातीची नोंद करण्यासाठी जातप्रमाणपत्र, बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे.