तीन वर्षात आंतरजातीय विवाहांचे ७२० प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:34 IST2020-12-04T04:34:30+5:302020-12-04T04:34:30+5:30
अमरावती : आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून जोडप्यांना ५० हजारांचे अनुदान दिले जाते. परंतु गत ...

तीन वर्षात आंतरजातीय विवाहांचे ७२० प्रस्ताव
अमरावती : आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून जोडप्यांना ५० हजारांचे अनुदान दिले जाते. परंतु गत तीन वर्षांतील ७२० पैकी ५२९ जोडप्यांना अनुदानच मिळालेले नाही. आतापर्यंत शासनाकडून योजनेसाठी १ कोटी२० लाखांचा निधी मिळाला आहे. निधी मागणीच्या तुलनेत अल्प प्रमाणात निधी मिळत असल्याने योजनेबाबत लाभार्थ्यांमध्ये नाराजी पसरत आहे.
सन २०१७-१८ ते २०१९-२० या तीन वर्षांत जिल्ह्यातून ७२० आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांनी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे प्रस्ताव सादर केले होते. आतापर्यंत २१० जोडप्यांनाच अनुदान मिळाले आहेत. शासनाकडून आर्थिक सहाय वेळेवर मिळत नसल्यामुळे योजनेला खीळ बसत असल्याचा सुरू उमटत आहे.
बॉक्स
यांना मिळतो योजनेचा लाभ
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यापैकी एक व्यक्ती आणि सवर्ण हिंदू, जैन, लिंगायत, बौध्द, शीख यापैकी दुसरी व्यकी अशांनी विवाह केल्यास तसेच मागासवर्गीय विवाहित जोडप्यांना ५० हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येते. हा धनादेश पती, पत्नीच्या संयुक्त नावाने दिला जातो.
बॉक्स
समाजकल्याणकडे आलेले एकूण प्रस्ताव
२०२७-१८ -२१०
२०१८-१९-३१९
२०१९-२०-२१०
आतापर्यंतचे अनुदान प्राप्त लाभार्थी
२१०