शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पेसा क्षेत्रातील शिक्षकांची ७ हजार १८७ पदे रिक्त; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर

By गणेश वासनिक | Updated: January 16, 2023 13:01 IST

राज्यपालांच्या अधिसूचनांकडे दुर्लक्ष; अनुसूचित क्षेत्र उपेक्षित

अमरावती : राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील १३ जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमधील वर्षानुवर्षे भरती न केल्यामुळे शिक्षकांची ७ हजार १८७ पदे रिक्त आहेत. एकट्या पालघर जिल्ह्यात मराठी माध्यमाची सर्वात जास्त ४४८१, तर पुणे जिल्ह्यात सर्वात कमी १७ पदे रिक्त आहे. उर्दू माध्यमाची पालघर जिल्ह्यात सर्वात जास्त ३६ पदे रिक्त आहेत, तर नाशिक जिल्ह्यात सर्वात कमी ३ पदे रिक्त आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात मात्र एकही जागा रिक्त नसल्याचे दाखविण्यात आले आहे. याबाबतची माहिती शासनाने शिक्षक बदली पोर्टलवर ४ ऑगस्ट २०२२ रोजी जाहीर केलेली आहेत.

आदिवासीबहुल भागात बिगर आदिवासी कर्मचारी कामात फारसा रस घेत नाही. कर्मचाऱ्यांना स्थानिक बोलीभाषा अवगत नसल्यामुळे आदिवासींना सेवा, सुविधा पुरविण्यात अडचणी येतात. अनुसूचित क्षेत्रात विविध सेवा, सुविधांच्या दर्जामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने राज्यपालांनी राज्यघटनेतील ५व्या अनुसूचितील परिशिष्ट ५ (१) नुसार अधिसूचना काढून १७ संवर्गातील पदे स्थानिक अनुसूचित जमातीमधून भरण्याचा निर्णय नऊ वर्षांपूर्वीच घेतला आहे. यात 'शिक्षक' हे पद आहे. अनुसूचित क्षेत्रातील शिक्षकांची भरतीच करण्यात न आल्यामुळे ७ हजार १८७ पदे सन २०१४ पासून रिक्तच आहेत.

अनुसूचित क्षेत्रातील १७ संवर्गातील पदे तर सोडाच. परंतु, शिक्षक या एका संवर्गातील पदे आठ वर्षापासून भरण्यात आलेली नाहीत. आता राज्य शासनाने तरी अनुसूचित क्षेत्रातील पदभरती भरण्यात यावी

- आजाबराव उईके, राज्य उपाध्यक्ष, ट्रायबल फोरम महाराष्ट्र

टॅग्स :Educationशिक्षणTeacherशिक्षकTrible Development Schemeआदिवासी विकास योजना