जिल्ह्यातील ६२ तलाव झाले ‘ओव्हर फ्लो’
By Admin | Updated: July 29, 2014 23:35 IST2014-07-29T23:35:00+5:302014-07-29T23:35:00+5:30
गत वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असला तरी मागील आठवड्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यातील ६२ तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत.

जिल्ह्यातील ६२ तलाव झाले ‘ओव्हर फ्लो’
मोहन राऊत - अमरावती
गत वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असला तरी मागील आठवड्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यातील ६२ तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत.
जिल्हापरिषद अंतर्गत ६५ सिंचन तलाव आहेत़ या तलावाची खोली सरासरी अडीच ते चार मिटर पर्यंत आहे़ दरवर्षी पावसाळ्यात हे तलाव पाण्याने ओव्हर फ्लो होतात. गत वर्षी हे तलाव भरले होते़ परंतु यंदा उन्हाळ्यात उन्हाचा पारा ४३ डिग्री च्यावर गेल्यामुळे ६२ तलाव कोरडे पडले होते़ तापमानामुळे या तलावाचा जलसाठा पुर्णंत: संपला होता़ गावातील जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत होती़ परंतु गत आठवड्यात जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने हे तलाव ओव्हर फ्लो झाले.
धारणी तालुक्यात असलेल्या १९ तलावातून बाहेर पाणी पडणे सुरू झाले आहे़ दुसऱ्या क्रमांकावर तिवसा तालुक्यात असलेल्या १९ तलावाची पातळी फुल्ल झाली आहे़ अमरावती, अचलपूर, नांदगाव खंडेश्वर या तालुक्यातील पाच तलाव शंभर टक््के भरले आहे़
चांदूरबाजार, मोशी या तालुक्यातील प्रत्येकी तीन लघु सिंचन तलावात पाणीसाठा वाढला आहे़ जिल्हा परिषद प्रशासनाने या तलावाकडे आपले विशेष लक्ष वेधून शेतातील पिकांना अथवा ग्रामस्थांना कोणताही धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यायला सुरूवात केली आहे़ या तलावावर संबंधित कर्मचाऱ्यांनी विशेष लक्ष ठेवावे, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाने दिले आहेत़