पश्चिम विदर्भात खरिपाची ६० टक्के पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:10 IST2021-06-29T04:10:29+5:302021-06-29T04:10:29+5:30
अमरावती : विभागात खरिपाच्या ६० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. सर्वाधिक ८७ टक्के पेरणी वाशिम जिल्ह्यात ...

पश्चिम विदर्भात खरिपाची ६० टक्के पेरणी
अमरावती : विभागात खरिपाच्या ६० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. सर्वाधिक ८७ टक्के पेरणी वाशिम जिल्ह्यात झाली आहे. गेल्यावर्षी याचदरम्यान ७३ टक्के पेरणी झाली होती. यावर्षी तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, कापूस पेरणीला वेग आला आहे.
अमरावती विभागात आतापर्यंत सरासरी १८४,४ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. यात बुलडाणा १३६.७, अकोला ७९.१ वाशिम २११.९, अमरावती १८९.४ आणि यवतमाळात २५७.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यावर्षीच्या ३२ लाख २८ हजार ५८१ हेक्टरपैकी १९ लाख ५३ हजार ८४५ हेक्टर क्षेत्रावर सध्या पेरणी झाली आहे. यात सोयाबीन ९.३९ लाख, कापूस ६.८७ लाख, तूर २.५६ लाख, मूग २० हजार, उडीद १७ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. आतापर्यंत सर्वाधिक पेरणी वाशिम जिल्ह्यात ८७.१ टक्के, यवतमाळ ७२.४, अमरावती ५९, बुलडाणा ५६.४, अकोला जिल्ह्यात २४ टक्के पेरणी झाली आहे.