शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यात ५६ जणांचा अपघाती मृत्यू; वर्षभरात ३२१ अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 17:10 IST

जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत ३२१ अपघाताच्या घटनांत ५६ जणांचा मृत्यू झाला, २९० नागरिक जखमी झाले आहेत. तसेच या वर्षात सप्टेंबरपर्यंत ३४८ अपघातात ५५ मृत्यमुखी पडले असून, २८३ जखमी झाले होते

अमरावती : जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत ३२१ अपघाताच्या घटनांत ५६ जणांचा मृत्यू झाला, २९० नागरिक जखमी झाले आहेत. तसेच या वर्षात सप्टेंबरपर्यंत ३४८ अपघातात ५५ मृत्यमुखी पडले असून, २८३ जखमी झाले होते. देशभरात वाढती अपघाताची आकडेवारी पाहता शासनाने ठोस उपाययोजना आवश्यक होती. मात्र, त्या तुलनेत उपाययोजना झाल्या नाहीत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अल्पकालीन व दीर्घकालीन उपाय सुचविण्यासाठी रस्ता सुरक्षा समिती स्थापित करण्यात आली आहे.चारचाकी वाहनधारकांनी क्षमतेपेक्षा अधिक व्यक्तींची वाहतूक करणे, बेदरकारपणे वाहन चालविणे, नशेत वाहन चालवणे, सीटबेल्ट न वापरणे, वेगमर्यादा न पाळण्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यासाठीवाहनांची कसून तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. अनेकदा शेतमाल किंवा कुठलीही वस्तू वाहून नेणाºया बैलगाड्या, मिनीट्रक अथवा ट्रेलर नादुरुस्त झाल्यास रस्त्यावरच सोडून दिले जातात. त्यावर कोणताही दिवा नसल्याने अपघात होतात. याबाबत संबंधितांना सूचना देण्याचे व आवश्यक तेव्हा कारवाईचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. आरोग्य विभागाने स्थानिक आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा व ट्रामाकेअर सेंटरचा आढावा घेऊन शासकीय व खासगी रुग्णवाहिकेचा माहितीकोष करण्याचेही निर्देश देण्यात आले आहे. 

अनियंत्रित, बेशिस्त वाहतुकीचेही बळीजिल्ह्याभरात बेशिस्त वाहतुकीमुळे अनेक अपघात घडत असल्याचे निदर्शनास आले असून, नियमबाह्य वाहतुकीमुळे बहुतांश बळी जात असल्याचे आढळून आलेत. ही अनियंत्रित व नियमबाह्य वाहतूक सुरळीत करण्यासाठीही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 

३४ ब्लॅकस्पॉटवर गतिरोधकजिल्ह्यातील ३४ ब्लॅक स्पॉटवर गतिरोधक, रंबलिंग स्ट्रीप, धोक्याचा इशारा देणारे बोर्ड उभारण्यात येत आहेत. दुचाकीवर दोनपेक्षा अधिक व्यक्तींनी प्रवास करणे, हेल्मेट न वापरणे, नियमभंग करणे आदी आढळल्यास पोलीस व महामार्ग पोलिसांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

सर्वोच्च न्यायालय आणि रस्ता सुरक्षा समितीच्या निर्देेशानुसार रस्ता सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहे. त्यासाठी विविध विभागांकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.- विजय काठोळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :AccidentअपघातAmravatiअमरावती