शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
3
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
5
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
6
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
7
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
8
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
9
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
10
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
11
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
12
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
13
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
14
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
15
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
16
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
17
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
18
साचलेले प्रश्न, दमलेले कार्यकर्ते, मरगळलेला प्रचार
19
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
20
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी

घरगुती बियाण्यांमुळे ५५ कोटींची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 5:00 AM

जिल्ह्यात यंदा २.६८ लाख हेक्टरमध्ये सोयाबीनची क्षेत्र आहे. यासाठी किमान १.२५ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांची मार्केटमधून खरेदी करण्यात आली आहे. दरवर्षीच आठ हजार रुपये क्विंटल दराप्रमाणे शेतकऱ्यांनी किमान १०० कोटींचे बियाणे खरेदी केलेले आहे. वास्तविक पाहता सोयाबीन हे स्वपरागसिंचित सरळ वाण असल्याने दरवर्षी मार्केटमधून नवीन बियाणे खरेदी करून पेरणी करण्याची आवश्यकता नाही.

ठळक मुद्देएसएओ । सोयाबीन उगवणशक्तीची हमी, स्वउत्पादित बियाणे राखून ठेवण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सोयाबीन पिकावर कीड व रोगाचा अटॅक व अतिपावसाने सोयाबीनची प्रतवारी यंदाही खराब होत आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांजवळ चांगल्या प्रतीचे सोयाबीन आहे, त्यांनी राखून ठेवण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे. याद्वारे जिल्ह्यात किमान ५० ते ५५ लाखांची बचत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्ह्यात यंदा २.६८ लाख हेक्टरमध्ये सोयाबीनची क्षेत्र आहे. यासाठी किमान १.२५ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांची मार्केटमधून खरेदी करण्यात आली आहे. दरवर्षीच आठ हजार रुपये क्विंटल दराप्रमाणे शेतकऱ्यांनी किमान १०० कोटींचे बियाणे खरेदी केलेले आहे. वास्तविक पाहता सोयाबीन हे स्वपरागसिंचित सरळ वाण असल्याने दरवर्षी मार्केटमधून नवीन बियाणे खरेदी करून पेरणी करण्याची आवश्यकता नाही. सर्र्वसाधारणपणे शेतकरी ६० ते ६५ टक्क्यांपर्यंत सोयाबीन बियाणे बाजारातून खरेदी करतात. १० टक्के शेतकऱ्यांनी विकत घेतल्यास हरकत नाही. मात्र, ९० टक्के शेतकऱ्यांनी घरचेच बियाणे तयार करून वापरायला पाहिजे. विशेष म्हणजे बाजारात आठ हजार रुपये प्रति क्विंटल असा दर आहे. उत्पादन करून विकताना सोयाबीनला ३५०० ते ३८०० रुपये असा दर मिळतो. त्यामुळे शेतकºयांनी किमान १० टक्के क्षेत्रावरील बियाणे तयार करून पेरणीसाठी वापरल्यास उगवणक्षमतेबाबत खात्री असते.चालू हंगामात ज्या शेतकºयांनी सुधारित जातीचे बियाणे पेरले असतील त्यांनी पुढील हंगामाकरिता बियाणे तयार करून राखून ठेवावे बियाण्यांची उगवणक्षमता मार्च ते जून महिण्यात तपासून पहावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवळे यांनी केले आहे.मळणी पारंपरिक पद्धतीने हवीसोयाबीनची मळणी पारंपरिक पद्धतीने काठीच्या साहाय्याने बडवून करावी. मळणीयंत्राद्वारे करायची झाल्यास ३५० ते ४५० वर फेरे व्हायला नकोत. त्यामुळे बियाण्यास इजा होणार नाही. मळणीयंत्रातील लोखंडी ड्रमवर रबर किंवा स्पंज लावला असल्यास बियाण्यांची गुणवत्ता चांगली राहील. मळणी ड्रमच्या चाकाची पुली व बेल्टची साईज वाढवून सुद्धा यंत्राचे फेरे कमी करता येतात, वाळलेले स्व्छ बियाणे ६० किलोपर्यंत ज्युट बारदाण्यातच भरावे. थप्पी ४ फुटांवर जाणार नाही, याची काळजी घ्यावी.असे करा घरीच बियाणे तयारज्या शेतकºयांनी सोयाबीनच्या प्रमाणीत बियाण्यांची तसेच १० वर्षाआतील प्रसारीत वाणाची पेरणी केलेली असेल अश्या शेतकºयांनी त्यांच्याकडे उत्पादीत सोयाबीन प्राधान्यानी राखूण ठेवावे. ज्या क्षेत्रातील सोयाबीन बियाणे निवडायचे आहे. अशा क्षेत्राच्या सभोवती तीन मीटर अंतर सोडून आतील उत्पादीत होणारे सोयाबीन बियाण्यांसाठी निवडावे. पाऊस आल्यास बियाण्यांची उगवणक्षमता कायम राखण्यासाठी पीक परिपक्वअवस्थेत असताना कापणीपूर्वी बावीस्टीन किंवा कॅप्टन या बुरशीनाशकाची फवारणी करावी.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती