शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

५२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 5:00 AM

जिल्ह्यातील ५२४ ग्रामपंचायतींच्या एप्रिल ते जून दरम्यान मुदत संपली आहे. सदर ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया मार्च महिन्यात सुरू झाली होती. यासाठी १६ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज व छाननीची प्रक्रियादेखील पूर्ण झाली होती. परंतु, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. आयोगाने कोरोनाबाबतच्या सद्यस्थितीसंदर्भात ग्रामपंचायतनिहाय माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडून मागविली होती.

ठळक मुद्देपडघम : २९ ग्रामपंचायतींमध्ये प्रभागरचना अंतिम करण्याची कार्यवाही

जितेंद्र दखनेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील एप्रिल ते जूनदरम्यान मुदत संपलेल्या ५२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नोव्हेंबर अथवा डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवाय माहे जुलै ते डिसेंबर महिन्यात मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया निवडणूक विभागाने सुरू केली आहे.जिल्ह्यातील ५२४ ग्रामपंचायतींच्या एप्रिल ते जून दरम्यान मुदत संपली आहे. सदर ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया मार्च महिन्यात सुरू झाली होती. यासाठी १६ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज व छाननीची प्रक्रियादेखील पूर्ण झाली होती. परंतु, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. आयोगाने कोरोनाबाबतच्या सद्यस्थितीसंदर्भात ग्रामपंचायतनिहाय माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडून मागविली होती. सदर माहितीचा अहवाल जिल्हा निवडणूक शाखेने आयोगाकडे सादर केला. त्यामुळे येत्या नोव्हेंबर महिन्यात दिवाळीनंतर ५२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होण्याची शक्यता निवडणूक विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.याशिवाय जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या २९ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींसाठी प्रभागरचना आणि आरक्षण निश्चितीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. यानुसार उपविभागीय अधिकारी यांच्या स्तरावर प्रभागरचना आणि त्यातील प्रभागाच्या आरक्षणाची प्रक्रिया २७ ऑक्टोबरपूर्वी अंतिम केली जाईल. त्यानंतर तो अहवाल त्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार असून, पडताळणीअंती ते त्याच दिवशी त्यावर स्वाक्षरी करतील. पुढे २ नोव्हेंबर रोजी हा अहवाल म्हणजेच निवडणूक असलेल्या प्रभागांची रचना व आरक्षणांची स्थिती घोषित केली जाईल.जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या अहवालानुसार नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ७, चिखलदरा ६, अचलपूर ४, धारणी ३, दर्यापूर, भातकुली, धामणगाव रेल्वे, तिवसा तालुक्यांतील प्रत्येकी २, तर चांदूर रेल्वे तालुक्यातील १ याप्रमाणे २९ ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुका दिवाळीनंतर होण्याचे संकेत सूत्रांकडून प्राप्त होत आहेत.या ग्रामपंचायतींत प्रभागरचना सुरूजिल्ह्यातील जुलै ते डिसेंबर दरम्यान मुदत संपणाऱ्या २९ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींसाठी प्रभागरचना आणि आरक्षण निश्चितीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये अचलपूर तालुक्यातील वझ्झर, पांढरी, मल्हारा, म्हसोना, धारणीमधील रंगुबेली, हिराबंबई व चेंडो, चिखलदरा तालुक्यातील काकादरी, खटकाली, अढाव, माखला, खिरपाणी व आमझरी, धामणगाव रेल्वे तालुक्यातील उसळगव्हाण व नायगाव, चांदूररेल्वे तालुक्यातील येरंड, दर्यापूरच्या रामतीर्थ व रुस्तमपूर, नांदगावमधील जळू, कंझरा, बेलोरा, हिरापूर, वडुरा, फुलआमला, पळसमंडळ व शिरपूर, तिवस्यामधील मार्डी व दिवानखेड आणि भातकुलीमधील विर्शी, बोरखडी आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत