चांदूर रेल्वे तालुक्यात ५१९ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:36 IST2021-01-08T04:36:35+5:302021-01-08T04:36:35+5:30
चांदूर रेल्वे : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ५० उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. ...

चांदूर रेल्वे तालुक्यात ५१९ उमेदवार रिंगणात
चांदूर रेल्वे : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ५० उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता निवडणूक चिन्हा मिळालेले एकूण ५१९ उमेदवार निवडणुकीतील प्रचारकार्याला लागले आहेत.
चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर येथे १० उमेदवारांनी माघार घेतली असून, १४ उमेदवार रिंगणात आहेत. राजुरा, मालखेड व बोरी येथे प्रत्येकी दोघांनी माघार घेतली असून, अनुक्रमे ३०, २४ व २३ उमेदवार रिंगणात आहेत. चिरोडी, बासलापूर, लालखेड व मांजरखेड दानापूरयेथे प्रत्येकी एकाने अर्ज मागे घेतल्यानंतर रिंगणात अनुक्रमे १८, १५, १४ व १३ उमेदवार आहेत. पळसखेड व निमगव्हाण येथे प्रत्येकी तिघांनी माघार घेतल्यानंतर अनुक्रमे २८ व १५ उमेदवार रिंगणात आहेत. धानोरा म्हाली येथे दोघांच्या माघारीनंतर २६ उमेदवार राहिले आहेत. बग्गी व टिटवा येथे पाच उमेदवारांनी माघार घेतली असून, अनुक्रमे २१ व १४ उमेदवार रिंगणात आहेत. जळका जगताप व जवळा येथे एकाच्या माघारीनंतर प्रत्येकी माघार घेतली असून २६ व १५ उमेदवार रिंगणात आहेत. आमला विश्वेश्वर व सातेफळ येथे दोघांनी माघार घेतली असुन २६ व १९ उमेदवार रिंगणात आहेत. सावंगा बुजरूक येथे तिघांनी माघार घेतली असून, १४ उमेदवार रिंगणात आहेत.
वाई-बोथ ग्रामपंचायतीत १६ उमेदवार रिंगणात आहेत. घुईखेड येथे २३, धानोरा मोगल येथे १४, शिरजगाव कोरडे येथे २४, सावंगा विठोबा येथे१४, जावरा येथे १४, किरजवळा येथे १२, धनोडी येथे १६, सुपलवाडा येथे १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीकरिता निर्वाचन अधिकारी म्हणून तहसीलदार राजेंद्र इंगळे, निवडणूक निर्णय अधिकारी सावन जाधव, राजेंद्र घड्डीनकर, गणेश घोगरकर, मीना म्हसतकर, सुरेश चव्हाण, ए.आर.चवरे, सतीश गोसावी, एस.एस. लंगडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कुकडी, चंद्रशेखर जयसिंगपुरे, भारत कांबळे, पंकज खानझोडे, दीपक शिरसाट, जितेंद्र मेश्राम, शिवदास चव्हाण, सी.एल. मोरे हे काम पाहत आहेत.
-----------सोनोरा येथे चौघे अविरोध
येरड ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध झाली असून सात सदस्य निवडले गेले. सोनोरा बुजरूक ग्रामपंचायतीच्या आखाड्यात १० उमेदवार आहेत. दोघांनी माघार घेतली, तर चौघांची अविरोध निवड झाली आहे.