रस्त्यांसाठी पालिकांना ५० कोटींचा निधी

By Admin | Updated: March 29, 2017 00:29 IST2017-03-29T00:28:41+5:302017-03-29T00:29:28+5:30

जिल्ह्यातील दहा नगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींना रस्ते विकास निधीतंर्गत ५० कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे ....

50 crore fund for the children | रस्त्यांसाठी पालिकांना ५० कोटींचा निधी

रस्त्यांसाठी पालिकांना ५० कोटींचा निधी

पालकमंत्री : जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा
अमरावती : जिल्ह्यातील दहा नगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींना रस्ते विकास निधीतंर्गत ५० कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आज नियोजनभवनातील सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठकीत सांगीतले.
दहा नगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी राज्य शासनाला ४७५ कोटींचा डीपीआर विकास आराखडा सादर केला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगरपालिकांना थेट निधी मिळावा म्हणून केंद्राकडे प्रस्ताव सादर केला आहे तो मंजूर झाल्यास आॅगस्ट २०१८ पर्यत ११५ ते १५० कोटींचा निधी मिळणार आहे. फक्त रस्ते बांधण्याऐवजी पेयजल व इतर सुविधाकडे नगरपालिकांनी लक्ष द्यावे. मुख्याधिकाऱ्यांनी व नगरसेवकांनी समन्वयाने काम करण्याची सूचना त्यांनी केली.
पुढील काही दिवसांत प्रत्येक नगरपालीकास्तरावर जाऊन बैठक घेणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. नगराध्यक्षांना १५ लक्ष व उपाध्यक्षांना १० लक्ष रुपये निधी देण्यात येणार आहे. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्यासह अंजनगावचेनगराध्यक्ष कमलाकांत लाडोळे, अचलपूर नगराध्यक्ष सुनीता फिस्के, चांदूरबाजार नगराध्यक्ष रवींद्र पवार, मोर्शी नगराध्यक्ष शीला रोडे, वरूड नगराध्यक्ष स्वाती आंडे, धामणगाव रेल्वेचे नगराध्यक्ष प्रताप अडसड, धारणी नगराध्यक्ष रजीयाबी मो.सर्फुद्दीन, प्रशासन अधिकारी वाहुरवाघ उपस्थित होते.
पश्चिम विदभार्तील चिखलदरा नगरपरिषद ही हागणदारीमुक्त नगरपरिषद आहे. त्याचप्रमाणे इतर नगरपालिकांनी १०० टक्के स्वच्छतेसाठी प्रयत्न करावे. जिल्ह्यातील पालिकांनी त्यांना दिलेल्या निधीचा वापर करावा. आचारसंहितेमुळे निधी वापराला मयार्दा आल्यात. पुढील वर्षी मात्र लवकर निधी देण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगीतले. जिल्ह्यात १८२ सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. १२ हजार शासनाचे व ५ हजार न.प.चे असे १७ हजार रुपयांचे अनुदान आता शौचालय बांधण्यासाठी मिळते. नगराध्यक्ष व उपाध्यक्षांनी काही सूचना यावेळेस केल्या. संचालन व आभार प्रदर्शन दर्यापूर पालिकेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: 50 crore fund for the children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.