शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

रवि राणांविरुद्ध 50 कोटींचा मानहानी दावा ठोकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2022 00:07 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात २९ ऑक्टोबर रोजी नोटीस देणार असल्याची माहिती आमदार बच्चू कडू यांनी शुक्रवारी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. गुवाहाटीला जाऊन जर मी पैसे घेतले असतील, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ते सिद्ध करावे, असा आक्रमक पवित्रा आमदार बच्चू कडू यांनी घेतला आहे. १ नोव्हेंबरपर्यंत आमदार रवी राणा यांनी पैसे घेतल्याचे पुरावे सिद्ध करावे, या मुद्द्यावर आपण ठाम असल्याचे ते म्हणाले. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याचा आरोप आमदार रवि राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केला. त्यामुळे या दोन्ही आमदारांतील हा वाद आता चांगलाच पेटला आहे. आमदार राणा यांच्याविरुद्ध ५० कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात २९ ऑक्टोबर रोजी नोटीस देणार असल्याची माहिती आमदार बच्चू कडू यांनी शुक्रवारी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. गुवाहाटीला जाऊन जर मी पैसे घेतले असतील, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ते सिद्ध करावे, असा आक्रमक पवित्रा आमदार बच्चू कडू यांनी घेतला आहे. १ नोव्हेंबरपर्यंत आमदार रवी राणा यांनी पैसे घेतल्याचे पुरावे सिद्ध करावे, या मुद्द्यावर आपण ठाम असल्याचे ते म्हणाले. अमरावती येथील महापालिका टाऊन हॉल येथे १ नाेव्हेबर रोजी राज्यभरातून प्रहारचे हजारो कार्यकर्ते शक्तिप्रदर्शन करतील, अशीही माहिती बच्चू कडू यांनी दिली.  

आईलासमोर करून घाणेरडे राजकारण खोके घेतल्याच्या आरोपावरून आमदार रवि राणा आणि बच्चू कडू यांच्यात वाद सुरू आहे, तर राजापेठ पोलीस ठाण्यात महिलांनी बच्चू कडूंविरोधात तक्रार दिली आहे. यात रवि राणा यांच्या आईवर अपशब्द वापरल्याचा आरोप कडू यांच्यावर आहे. याविषयी बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले, मी आमदार रवि राणांच्या आईवर बोललो नाही, रवी राणांनी  हे घाणेरडे राजकारण करू नये. रवि राणा आईला समोर करून स्वतः पडद्याआड आहेत. स्वतःला लपण्यासाठी आईला समोर करत असल्याचा आरोपदेखील यावेळी बच्चू कडू यांनी केला आहे.

खोके घेतले की नाही, हे अगोदर स्वत:च आमदार बच्चू कडू यांनी ईडी किंवा सीबीआयमार्फत चौकशी करून घ्यावी. तेव्हा सत्य बाहेर येईल. लोकशाहीत कोणाला कोणावरही दावा ठोकता येतो. नोटीस आल्यास कायदेशीर उत्तर दिले जाईल. आईसंदर्भात राजापेठ पोलिसात कोणी तक्रार दिली, याची माहिती नाही. - रवि राणा, आमदार, बडनेरा

 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूRavi Ranaरवी राणा