पाच ग्रा.पं.ची निवडणूक घोषित
By Admin | Updated: March 13, 2016 00:05 IST2016-03-13T00:05:55+5:302016-03-13T00:05:55+5:30
जिल्ह्यात मे ते आॅगस्ट २०१६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या पाच ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व ७९ ग्रामपंचायतींच्या १०९ रिक्त सदस्यपदाची निवडणूक ....

पाच ग्रा.पं.ची निवडणूक घोषित
आचारसंहिता लागू : १७ ला मतदान, १८ एप्रिल रोजी मतमोजणी
अमरावती : जिल्ह्यात मे ते आॅगस्ट २०१६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या पाच ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व ७९ ग्रामपंचायतींच्या १०९ रिक्त सदस्यपदाची निवडणूक आयोगाने शुक्रवारी उशिरा जाहीर केली. या निवडणुकांसाठी १७ एप्रिल रोजी मतदान व १८ ला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकांसाठी शुक्रवार १८ मार्चच्या मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू झाली आहे.
अमरावती तालुक्यामधील रोहणखेड व उंबरखेड तसेच तिवसा तालुक्यामधील आखतवाडा, कवाडगव्हाण व घोटा या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व चिखलदरा तालुक्यामधील सोनापूर, टेंभूरसोडा, हतरू, रुईपठार, चिंचखेड, रायपूर, माखला, खिरपानी, सोमठाना खुर्द, अढाव, आमझरी, काकदरी, तिवसा तालुक्यामधील सार्सी, अनकवाडी, दुर्गवाडा, मोर्शी तालुक्यातील वणी, गोराळा, बेलोना, शिरुर, मायवाडी, नशिरपूर, लिहिदा, भाईपूर, पोरगव्हाण, चिंचोली गवळी, मनीमपूर, चांदूरबाजार तालुक्यातील गोविंदपूर, कल्होडी, खरपी, मासोद, मिर्झापूर, तळणीपूर्णा, धानोरापूर्णा, चांदूररेल्वे तालुक्यांमधील कळमगाव, पाथरगाव आदी ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्य पदासाठी ही निवडणूक होत आहे.
३० दिवसांत खर्च सादर करणे बंधनकारक
अमरावती : तालुक्यामधील बोरगाव धर्माळे, कुंड सर्जापूर, माहुली जहागीर, सावर्डी, काटआमला, वरूड तालुक्यामधील गणेशपूर, बेनोडा, धारणी तालुक्यामधील कुसमकोट, विरोटी, सावलीखेडा, रेहट्या, नांदुरी, खाऱ्याटेंभरू, चटवाबोळ, कुटंगा, सुसर्दा, कारादा, दादरा, हिराबंबई, काटकुंभ, अचलपूर तालुक्यातील निमदरी, बेलखेडा, पिंपळखुटा, भातकुली तालुक्यामधील बैलमारखेडा, मार्की, वातोडा, म्हैसपूर, कुमागड, धामणगाव रेल्वे तालुक्यामधील जळगाव, निंबोली, कळासी, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा शिक्रा, दर्यापूर तालुक्यातील घोडचंदी, घडा, जसापूर, सुरळी, चंद्रपूर, उमरी, पिंपळखुटा व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोली खुर्द, चिंचोली बु., खोडगाव या ७९ ग्रामपंचायतींच्या १०९ रिक्त सदस्यपदांसाठी ही निवडणूक होत आहे.
या ग्रामपंचायतीसाठी संबंधित परिक्षेत्रात शुक्रवारी रात्री १२ वाजल्यापासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. तसेच या निवडणुकीकरिता उमेदवारी अर्जासह पूर्ण निवडणूक प्रक्रिया पारंपरिक पद्धतीने राबविण्यात येणार आहे व उमेदवारांना जंगम मालमत्ता, दोषसिद्धीनंतर झालेली शिक्षा व शिक्षण इत्यादीबाबत घोषणापत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना हे घोषणापत्र घेण्याविषयी सूचना आयोगाने दिल्या आहेत.
निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना व बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांनासुद्धा दैनंदिन खर्चाचा हिशोब निवडणूक निकाल जाहिर झाल्याच्या ३० दिवसाचे आत दाखल करणे बंधनकारक आहे. (प्रतिनिधी)