शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

मुदत संपूनही 49 हजार जणांनी घेतला नाही लसीचा दुसरा डोस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:01 IST

आता लसीकरण केंद्रावरही दुसरा डोस घेण्यासाठी अशांची धडपड होत आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर ठरवून दिल्याप्रमाणे लसीचा पुरवठा होतो. त्या काहींना डोस मिळतात, तर काहींना आल्यापावली परत जावे लागल्याचे चित्र आहे. शासनाने नि:शुल्क उपलब्ध केलेल्या लसीसाठी नागरिकांनी पूर्वी प्रचंड गर्दी केली. नंबर लावण्याकरिता रांगेत उभे राहत होते.  मात्र आता गर्दी ओसरल्याने सहज उपलब्ध होत असताना लसीकरणाकडे नागरिक पाठ देताना दिसून येत आहे.

जितेंद्र दखनेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाच्या दुसरऱ्या लाटेचा संसर्ग कमी होत असता तरी संभाव्या दुसरऱ्या लाटेचा धोका कायम आहे. परिणामी लसीकरणालाही गती आली आहे. नोकरी शिक्षण यासह महत्त्वाच्या कामासाठी दोन्ही डोस घेणे बंधनकारक केल्यामुळे १८ ते ४४ या वयोगटात लसीकरणालाही गर्दी होत आहे. ३१ आऑगस्टपर्यंत १०,९८,७३३ जणांनी लस घेतली आहे.  त्यात ७ लाख ९१ हजार ४५१ नागरिकांनी पहिला डोस, तर ३ लाख ७२ हजार ८२ जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र, ४९ हजारांवर  नागरिकांनी पहिला डोस घेऊन दुसऱ्या डोससाठीची मुदत संपल्यानंतरही डोस घेतलेला नाहीत. त्यामुळे आता लसीकरण केंद्रावरही दुसरा डोस घेण्यासाठी अशांची धडपड होत आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर ठरवून दिल्याप्रमाणे लसीचा पुरवठा होतो. त्या काहींना डोस मिळतात, तर काहींना आल्यापावली परत जावे लागल्याचे चित्र आहे. शासनाने नि:शुल्क उपलब्ध केलेल्या लसीसाठी नागरिकांनी पूर्वी प्रचंड गर्दी केली. नंबर लावण्याकरिता रांगेत उभे राहत होते.  मात्र आता गर्दी ओसरल्याने सहज उपलब्ध होत असताना लसीकरणाकडे नागरिक पाठ देताना दिसून येत आहे.

दुसरा डोस घेणेही तितकेच आवश्यककोरोनापासून सुरक्षिततेसाठी शासनाकडून लसीकरण मोहीम जिल्ह्यातील विविध केंद्रावर राबविली जात आहे. पहिला डोस घेतल्यानंतर कोविशिल्ड -८४ व कोव्हॅक्सिन २८ दिवसांनी घेणे आवश्यक आहे. परंतु अनेकांनी पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेणेही नागरिकांच्या सुरक्षीततेसाठी आवश्यक आहे.

लस न घेण्यामागे नेकमी अडचण काय?आरोग्य विभागाच्यावतीने शहर व जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची मोहीम गत काही महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, सुरुवातीला लसीसाठी प्रतिसाद अल्प  होता. त्यानंतर दुसऱ्या लाटेचा धसका घेत नागरिकांनी स्वत:च्या सुरक्षिततेसाठी लस घेण्यासाठी कल वाढला. अशातच लसीकरण केंद्रावर लसीचा तुटवडा असतो. कधी लस मोजक्याच असतात.  अशावेळी लस घेण्यासाठी  आलेल्या  नागरिकांना तसेच  परत जावे लागते. अशा अडचणींचा सामना दरम्यान अनेकांना करावा लागला.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या