शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

४,७३२ लाभार्थींच्या डीपीआर, ५६ कोटी उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 22:00 IST

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ४७३२ लाभार्थींच्या डीपीआरला केंद्र शासनाच्या समितीने मान्यता दिली आहे. यामध्ये मंजूर प्रस्तावाच्या ४० टक्के हिश्श्यापोटी ५५.८६ कोटी महापालिकेला प्राप्त झाले आहेत. या घटकात लाभार्र्थींंचे उत्पन्न तीन लाखांचे असणे बंधनकारक आहे. यामध्ये ३० चौ.मी. चटई क्षेत्राचे घरकुल बांधकाम लाभार्र्थींना करावयाचे आहे. प्रगतीनुसार अडीच लाखांचे अनुदान महापालिका वितरित करणार असल्याचे महापालिकेच्या बांधकाम विभागाने सांगितले.

ठळक मुद्देकेंद्र शासनाच्या समितीची मान्यता : पीएमएवाय अंतर्गत ६३ हजार ७३२ आॅनलाईन अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ४७३२ लाभार्थींच्या डीपीआरला केंद्र शासनाच्या समितीने मान्यता दिली आहे. यामध्ये मंजूर प्रस्तावाच्या ४० टक्के हिश्श्यापोटी ५५.८६ कोटी महापालिकेला प्राप्त झाले आहेत. या घटकात लाभार्र्थींंचे उत्पन्न तीन लाखांचे असणे बंधनकारक आहे. यामध्ये ३० चौ.मी. चटई क्षेत्राचे घरकुल बांधकाम लाभार्र्थींना करावयाचे आहे. प्रगतीनुसार अडीच लाखांचे अनुदान महापालिका वितरित करणार असल्याचे महापालिकेच्या बांधकाम विभागाने सांगितले.सर्वांसाठी घरे या योजनेंतर्गत चार घटकांमध्ये महापालिका क्षेत्रात सन २०२१-२२ पर्यंत २४ हजार ८१० घरकुल बांधण्यात येणार आहेत. यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ६३ हजार ७३२ नागरिकांनी आॅनलाईन अर्ज केलेत. या योजनेत सद्यस्थितीत १२० घरकुल पूर्ण होऊन नागरिक राहायला गेले असून, आतापर्यंत आठ लाख ४५ हजारांच्या निधीचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्या बांधकाम विभागाने दिली. ‘सर्वांसाठी घरे’ ही योजना देशभरात राबविण्यात येत आहे. राज्यात गृहनिर्माण विभागांतर्गत शहरी भागाकरिता महापालिकाद्वारे याची अंंमलबजावणी करण्यात येत आहे. अमरावती शहरासाठी सन २०२१-२२ या कालावधीपर्यंत शासनाने २४ हजार ८१० ही लाभार्थीसंख्या निश्चित केलेली आहे. यामध्ये सन १७-१८ मध्ये २४८१ लाभार्थी, सन २०१८-१९ मध्ये ४९६२, सन २०१९-२० करिता ४९६३, सन २०२०-२१ करिता ४९६२ व सन २०२१-२२ करिता ७४४३ असे उद्दिष्ट महापालिकेला देण्यात आलेले आहे.घटक क्रमांक १ करिता महापालिका हद्दीत घोषित झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मालकी हक्काचे पट्टेवाटप होण्याच्या दृष्टीने बैठकीचे आयोजन करण्यासाठी महापालिकेद्वारा जिल्हा प्रशासनास पत्र देण्यात आलेले आहे. घटक क्रमांक २ साठी कर्ज संलग्न व्याज अनुदानाचे माध्यमातून आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणाºया घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये महापालिकेला ४६०९ अर्ज प्राप्त झाले. ही यादी अग्रणी बँकेला देण्यात आली. त्यानुसार बँकेने २१३ लाभार्थ्यांना गृहकर्ज देण्यात आल्याची माहिती या विभागाचे उपअभियंता सुनील चौधरी यांनी दिली.नऊ लाखांची राहणार सदनिकामहापालिकेच्या हद्दीत मौजा बडनेरा, बेनोडा, निंबोरा, नवसारी, तारखेड, म्हसला, रहाटगाव येथील भूखंडाची निवड करण्यात आलेली आहे. सदनिकेची किंमत नऊ लाख राहणार आहे. यामध्ये लाभार्थी हिस्सा सहा लाख रुपयांचा असल्याने तो प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून शहरातील बँकांशी समन्वय साधण्यात येऊन लाभार्थींना गृहकर्ज उपलब्ध करण्यात येत आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया आटोपल्याने विकसक मेसर्स गॅणन डंर्कले यांना १२ डिसेंबरला कार्यारंभ आदेश देण्यात आलेला आहे. या अंतर्गत ८६० घरकुल २०२० या कालावधीत पूर्ण करण्यात येत असल्याचे उपअभियंता चौधरी यांनी सांगितले.अशी आहे योजनेची सद्यस्थितीघरकुलाचे बांधकामासाठी सद्यस्थितीत १९४६ नकाशे मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी ९१३ नकाशांना मंजुरात देण्यात आली, तर या सर्व लाभार्र्थींंना कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत. या घरकुलांचे जोथ्यापर्यंत बांधकाम झाल्याने ४८९ लाभार्थींकरिता प्रत्येकी एक लाख रुपयांचे अनुदान देण्यात आलेले आहे. अनुदानाचा दुसरा टप्पा प्रत्येकी एक लाख रूपये हा ३२४ लाभार्थींना देण्यात आला आहे. अनुदानाचा तिसरा टप्पा प्रत्येकी ५० हजार रुपये हे ६३ लाभार्थींना देण्यात आलेले आहे. आतापर्यंत १२० घरकुल पूर्ण झाले असून, लाभार्थी राहावयास गेलेले आहे.