शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

‘आधार’चा खोडा; ४६ हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेची रक्कम मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 8:21 PM

सर्वसामान्य शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी, यासाठी केंद्र शासनाने गतवर्षीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दरवर्षी दोन हजार प्रत्येकी तीन हप्त्यांत देण्याची घोषणा केली.

अमरावती : ‘पंतप्रधान किसान सन्मान’ योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ८८ हजार २०८ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविलेला आहे. यापैकी यंदा वर्षात २३ हजार १८७ शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजारांची मदत मिळाली आहे. आतापर्यंत ९५ हजार ४०६ शेतकऱ्यांनी आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न केले असले तरी अद्यापही ४६ हजार ३०७ खाते विनाआधार आहेत. या खातेदारांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. सर्वसामान्य शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी, यासाठी केंद्र शासनाने गतवर्षीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दरवर्षी दोन हजार प्रत्येकी तीन हप्त्यांत देण्याची घोषणा केली. त्यानुसार शेतकऱ्यांना लाभ देण्यात येत आहे. या योजनेसाठी जिल्ह्यात २ लाख ८८ हजार ४६८  शेतकरी पात्र ठरले आहेत. यापैकी १ लाख ७८ हजार ३१५ शेतकऱ्यांना मदतीचा पहिला हप्ता बँक खात्यात जमा करण्यात आला.त्यानंतर या योजनेच्या लाभासाठी आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करण्याची अट घालण्यात आली. त्यानंतर १,३५,७३९ शेतकºयांच्या बँक खात्यात दुसरा हप्ता जमा करण्यात आला. ९६,०७४ शेतकऱ्यांना तिसरा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. या योजनेसाठी खातेदार शेतकºयांचा सात-बारा, गाव नमुना ८, आधार कार्ड, बँक खातेक्रमांक आदी माहिती केंद्र शासनाच्या संकेत स्थळावर अपलोड करण्यात आली. कृषी आयुक्तांच्या निर्देशानुसार पी.एम. किसान योजनेचा लाभ मिळालेल्या पाच टक्के लाभार्थींची पडताळणी करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये २.५ टक्के नावे केंद्र व २.५ टक्के लाभार्थी निवड जिल्हास्तरावर करण्यात आली. त्यानुसार या पाच टक्के लाभार्थींची पडताळणी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत आधार कार्ड संलग्न करण्यासाठी गावागावांत शिबिर घेण्यात येत आहेत.

तालुकानिहाय शेतकरी सहभागयोजनेमध्ये अचलपूर तालुक्यात २३ हजार ४२२ शेतकरी, अमरावती १७ हजार ५५४, अंजनगाव सुर्जी २१ हजार १७१, भातकुली १७ हजार ५०७, चांदूर रेल्वे १५ हजार ०७१,  चांदूर बाजार २५ हजार ५२५, चिखलदरा १२ हजार ५९५, दर्यापूर २३ हजार ६३८, धामणगाव रेल्वे २० हजार ८८३, धारणी १७ हजार ८१९, मोर्शी २४ हजार ७२५, नांदगाव खंडेश्वर २४ हजार ६६९, तिवसा १८ हजार ६३, तर वरूड तालुक्यात २५ हजार ८८१ शेतकºयांनी सहभाग नोंदविल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.  योजनेची जिल्हा स्थिती* अपलोड डेटा - २,८८,४६८* पहिला हप्ता - १,७८,३१५* दुसरा हप्ता - १,३५,७३९* तिसरा हप्ता - ९६,३७४* यंदा पहिला हप्ता- २३,१८७* आधार बाकी - ९५,४०६* आधार दुरुस्ती -४६३०७

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डFarmerशेतकरीAmravatiअमरावती