शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

सहा महिन्यांत २२२ रस्ता अपघातात ४६ बळी; उपाययोजनांकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 19:10 IST

अमरावती शहराची लोकसंख्या नऊ लाखांपर्यंत पोहोचली असून अडीच लाखांवर वाहने शहरात धावत आहेत.

- वैभव बाबरेकर

अमरावती : वाढती वाहने ही एक समस्या निर्माण झाली असून, रस्ता अपघाताचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. सहा महिन्यांत अमरावती शहरात तब्बल २२२ अपघातांमध्ये ४६ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे नियमबाह्य वाहतुकीवर ठोस पावले उचलणे गरजेचे झाले आहे. मात्र, प्रशासन विकासकामांचे कारण पुढे करून उपाययोजनांकडे दुर्लक्ष करीत आहे. 

अमरावती शहराची लोकसंख्या नऊ लाखांपर्यंत पोहोचली असून अडीच लाखांवर वाहने शहरात धावत आहेत. लाखोंच्या संख्येने दुचाकी, मोटारी, रस्त्यावर आल्याने व अधून-मधून विकासाच्या नावावे होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नियम धाब्यावर बसून वाहनधारक मार्गक्रमण करीत आहेत. अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच सिमेंटचे रस्ते उदयास येत असल्यामुळे वाहतुकीची ऐसीतैशी झालेली आहे. या कामांमध्ये अरुंद रस्त्यावर वाहतुकीचा वेग वाढला आहे.

वाढत्या अपघाताने जखमी, बळींची संख्याही वाढत चालली आहे. जानेवारी ते जून २०१९ या सहा महिन्यांत शहरात तब्बल २२२ रस्ते अपघात घडले. त्यात ४६ जणांचा मृत्यू झाला. वर्षभरात ४५३ अपघातांमध्ये ९० जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ११८ नागरिक गंभीर, तर २५८ किरकोळ जखमी झाले होते. त्यामुळे गतवर्षाच्या तुलनेत यंदा अपघाताच्या संख्येसोबत मृत्यू होण्याचीही संख्या वाढलेली आहे. सात वर्षांत ५४० जणांचे मृत्यूअमरावती शहरातील विविध मार्गांवर २०११ ते २०१७ दरम्यान सात वर्षांत तब्बल ३ हजार ६८७ अपघात झाले. यात ५४० जणांचा मृत्यू झाला. याशिवाय ५२२ प्राणांतिक अपघात, ६०७ गंभीर अपघात, २ हजार ५५८ किरकोळ अपघात घडले आहेत. 

नागरिकांनी जबाबदारीचे भान ठेवावेवाहनांच्या अपघातातील मृत्युमुखी पडणारे बहुंताश १५ ते २५ वयोगटातील तरुणांची संख्या अधिक आहे. अनेक अपघातांत कुटुंबप्रमुखांचाच मृत्यू झाला.  कमावता व्यक्ती गेल्यामुळे ते कुटुंबत उघड्यावर आले. रस्त्यावरचे बहुतांश अपघात रात्रीच्या वेळीच झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहन चालविताना आपली जबाबदारी व वाहतूक नियमांचे भान ठेवणे आवश्यक आहे. 

उपचाराअभावी मृत्यू अपघातानंतर जखमींवर वेळीच उपचारही होत नसल्याने मृत्यूची संख्या वाढत आहे. अनेकदा नागरिक जखमी अवस्थेत तासंतास पडून असतात, त्यांना वेळेत उपचार मिळत नाही. त्यातच गंभीर जखमींना नागपूरला हलविताना वेळेत पोहचणे अशक्य झाल्यामुळेसुद्धा मृत्यू ओढवत असल्याचे निदर्शनास येत आहे.  

अपघाताची कारणेअतिवेगाने आणि मद्यधुंद अवस्थेत वाहने चालविणे, नियमांचे उल्लंघन करणे, पुरेशी झोप न घेताच गाव गाठण्याची घाई करणे आदी कारणांनी अपघाताचा प्रसंग ओढवतो. याशिवाय खराब रस्ते, सुमार खड्डेही अपघातास कारणीभूत ठरतात. वाहनचालकांची चूक नसताना वाहन खड्ड्यात गेल्याने दरवर्षी हजारो अपघात घडतात आणि वाहनचालकांचे नाहक बळीही जातात. 

वाहतूक सुरक्षित व्हावी, यादृष्टीने विविध उपाययोजना सुरू असतात. त्या दृष्टीने नो-पार्किंग झोन तयार केले आहेत. नागरिकांच्या हरकती मागविल्या आहेत. - रणजित देसाई, सहायक पोलीस आयुक्त, अमरावती

टॅग्स :AccidentअपघातAmravatiअमरावती