मोर्शी तालुक्यात ४२ नवे कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:13 IST2021-04-15T04:13:01+5:302021-04-15T04:13:01+5:30

मोर्शी तालुक्यात ४२ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले, तर तीन रुग्णांचा कोरोनाने जिल्हा कोविड रुग्णालयात मृत्यू झाल्याची धक्कादायक ...

42 new corona affected in Morshi taluka | मोर्शी तालुक्यात ४२ नवे कोरोनाबाधित

मोर्शी तालुक्यात ४२ नवे कोरोनाबाधित

मोर्शी तालुक्यात ४२ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले, तर तीन रुग्णांचा कोरोनाने जिल्हा कोविड रुग्णालयात मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आहे.

तालुक्यातील नेरपिंगळाई येथील (५५) वर्षीय पुरुष, येरला येथील (३०) वर्षीय पुरुष, खोपडा येथील (६०) वर्षीय पुरुषाचा कोरोनाने जिल्हा कोविड रुग्णालयात मृत्यू झाला.

अमरावती येथील जिल्हा शल्यचिकित्सकांच्या माहितीनुसार, जिल्ह्यात २४ तासात ८ रुग्ण कोरोनाने दगावले असून, यात मोर्शी तालुक्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात ४२ नवे रुग्ण आढळून आले आहे. सालबर्डी, पाळा, खोपडा, शिरखेड, दापोरी, हिवरखेड, रिद्धपूर, तरोडा, चिंचोली गवळी या गावात प्रत्येकी एक रुग्ण सिंभोरा व मायवाडी येथे प्रत्येकी दोन कोरोनाग्रस्त नवे रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात सर्वाधिक खेड या गावात सात नवे रुग्ण आढळल्याची माहिती आहे.

मोर्शी नगरपालिकेच्या हद्दीत अजमिरे ले-आऊट, प्रज्ञा कॉलनी, गुजरी बाजार, समर्थ कॉलनी, आयोध्या नगर ,गुरुदेव नगर ,श्रीराम कॉलनी, मालवीय गार्डन, महादेव कॉलनी, यशवंत कॉलनी व रेल्वे क्वार्टर येथे प्रत्येकी तीन नवे कोरोना रुग्ण आढळल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

Web Title: 42 new corona affected in Morshi taluka