धारणीतून ४१ किलो गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:17 IST2021-08-27T04:17:35+5:302021-08-27T04:17:35+5:30
धारणी : शहरातील अमरावती बऱ्हाणपूर मुख्य मार्गावर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या तपासणी नाक्याजवळ धारणी पोलिसांनी ४१ किलो गांजा घेऊन सायंकाळी ...

धारणीतून ४१ किलो गांजा जप्त
धारणी : शहरातील अमरावती बऱ्हाणपूर मुख्य मार्गावर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या तपासणी नाक्याजवळ धारणी पोलिसांनी ४१ किलो गांजा घेऊन सायंकाळी पाच वाजता ताब्यात घेतला. धारणी शहरात दुचाकीने प्रवेश करताना दोन आरोपींना अटक करण्यात आली.
पोलीस सूत्रांनुसार, आरोपी सय्यद अली सय्यद हासम (रा. धारणी) आणि अर्पित संजय मालवीय (रा. कवळाझिरी) हे दोन आरोपी अमरावतीवरून धारणी येथे पल्सर दुचाकी वाहन क्रमांक एमएच २७ एएन ०२३५ क्रमांकाच्या दुचाकीने येत असताना धारणी पोलिसांनी त्यांना शिताफीने अटक केले. त्यांच्याकडून चार लाखांचा ४१ किलो गांजा व दुचाकी अशाप्रकारे साडेचार लाख रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आले.
ठाणेदार सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गिते व मंगेश भोयर, जमादार चंद्रशेखर पाठक, आशिष मेटनकर, जगन तेलगोटे, राहुल रेवस्कर, महिला शिपाई वंदना तायडे आणि चालक संजय मिश्रा यांनी ही कारवाई पार पाडली. ठाणेदार सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.