एनआरसी विरोधातील ४०० आंदोलनकर्ते ‘डिटेन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 05:00 IST2020-01-09T05:00:00+5:302020-01-09T05:00:07+5:30

अमरावती शहरात विविध कर्मचारी संघटनांनी आंदोलनात हिरीरीने सहभाग नोंदवून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. दरम्यानच एनआरसीविरोधात बामसेफ, बहुजन क्राँती मोर्चा आणि काही मुस्लिम संघटनांचे पदाधिकारी मोर्चा काढण्यासाठी सायन्स्कोर मैदानात एकत्रित आले. या संघटनांनी पोलिसांकडे रीतसर परवानगी मागितली होती. त्यांना इर्विन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सोपविण्यासाठी मोर्चा काढण्याबद्दल पोलिसांनी सांगितले होते. तरीसुद्धा विविध संघटनांचे कार्यकर्ते सायन्स्कोर मैदानात एकत्रित आले.

400 protesters 'detente' against NRC | एनआरसी विरोधातील ४०० आंदोलनकर्ते ‘डिटेन’

एनआरसी विरोधातील ४०० आंदोलनकर्ते ‘डिटेन’

ठळक मुद्देसायन्स्कोर मैदानात नारेबाजी : विनापरवानगी मोर्चामुळे कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात सायन्स्कोर मैदानावर जमलेल्या ४०० आंदोलकांना पोलिसांनी बुधवारी दुपारी 'डिटेन' करून वसंत हॉल येथे नेले. त्यांना समज देऊन सोडण्यात आले. परवानगीतील अटी-शर्तीनुसार मोर्चा काढण्यात न आल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली.
'भारत बंद'च्या घोषणेमुळे अमरावती शहरात विविध कर्मचारी संघटनांनी आंदोलनात हिरीरीने सहभाग नोंदवून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. दरम्यानच एनआरसीविरोधात बामसेफ, बहुजन क्राँती मोर्चा आणि काही मुस्लिम संघटनांचे पदाधिकारी मोर्चा काढण्यासाठी सायन्स्कोर मैदानात एकत्रित आले. या संघटनांनी पोलिसांकडे रीतसर परवानगी मागितली होती. त्यांना इर्विन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सोपविण्यासाठी मोर्चा काढण्याबद्दल पोलिसांनी सांगितले होते. तरीसुद्धा विविध संघटनांचे कार्यकर्ते सायन्स्कोर मैदानात एकत्रित आले. तेथे एनआरसीविरोधात नारेबाजी करून निषेध नोंदविला. त्यामुळे कायदा व शांतता राखण्याच्या उद्देशाने पोलिसांचा मोठा ताफा सायन्स्कोर मैदानात पोहोचला. पोलिसांनी आंदोलकांना समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते ऐकत नसल्याचे पाहून पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना 'डिटेन' केले. पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसून आंदोलनकर्त्यांना वसंत हॉल येथे नेण्यात आले. तब्बल ४०० आंदोलनकर्त्यांना यावेळी डिटेन करण्यात आले होते. पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांच्या नेत्तृत्वात सहायक पोलीस आयुक्त सुहास भोसले, कोतवालीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांच्यासह पोलिसांच्या मोठ्या ताफ्याने सायन्स्कोर मैदानातून सुरू झालेल्या मोर्चाच्या बंदोबस्ताची धुरा सांभाळली.

इर्विन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाण्यास आंदोलनकर्त्यांना सांगितले होते. मात्र, ते सायन्स्कोर मैदानात गोळा झाले. त्यामुळे काही आंदोलनकर्त्यांना डिटेन केले होते. त्यांना समज देऊन सोडण्यात आले.
- शिवाजी बचाटे, पोलीस निरीक्षक, कोतवाली

Web Title: 400 protesters 'detente' against NRC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस