शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

 चार वर्षांपासून शासनाकडे अडकले आरटीईचे ४० कोटी; शाळा व्यवस्थापनासमोर पेच, शिक्षकांचे वेतनही रखडले

By जितेंद्र दखने | Updated: November 6, 2023 20:17 IST

शासनाने एकीकडे शिक्षणाचा अधिकार म्हणून आरटीईअंतर्गत प्रत्येक शाळांना २५ टक्के विद्यार्थी प्रवेशाची सक्ती केली.

अमरावती : शासनाने एकीकडे शिक्षणाचा अधिकार म्हणून आरटीईअंतर्गत प्रत्येक शाळांना २५ टक्के विद्यार्थी प्रवेशाची सक्ती केली, तर दुसरीकडे गत चार वर्षांपासून आरटीईचे ४० कोटी रुपये जिल्ह्यातील २३६ शाळांना अद्यापही मिळालेले नाहीत. शासनाच्या उदासीन धोरणामुळे आरटीई प्रवेश देणाऱ्या शाळांच्या आर्थिक अडचणींमध्ये वाढ होत आहेत. शाळा चालवायचीच कशी, असा प्रश्न विनाअनुदानित खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांना पडला आहे. 

शाळा चालविण्यासाठी या शाळांनाही दर्जा कायम ठेवावा लागतो, यासाठी पैशाची आवश्यकता असते. शाळा-शाळांमध्येही स्पर्धा आहेच. यासाठी खिशातून पैसे खर्च करावे लागत असल्याने, काही शाळा आर्थिक डबघाईस आल्या आहेत. शैक्षणिक सुविधा, खेळणी, आधुनिकीकरणावर खर्च करायचा तरी कुठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे शाळांसमोर अडचणीचा डोंगर वाढत आहे. आरटीईअंतर्गत जेवढे विद्यार्थी शिकतात, त्यांचे शुल्क शासन शाळांना देत असते, परंतु मागील चार वर्षांपासून शासनाने निधीच दिला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील २३६ शाळांना प्रति विद्यार्थी १७ हजार ४२० प्रमाणे शासनाकडून चार वर्षांचे एकूण ६० कोटी ३० लाख ३ हजार १६० रुपये घेणे होते, असे असताना शासनाकडून २२ कोटी १२ लाख ९४ हजार ७०० रुपये मिळाले आहेत. यंदा पुन्हा १९ लाख ५० हजार द्यावे. कारण मागील ४ वर्षांपासून पैसे मिळाले आहेत. त्यानंतरही अद्याप ४० कोटी रुपयांचा निधी शासनाकडे थकीत आहे. त्यामुळे शाळांच्या आर्थिक अडचणी वाढल्या असून, शिक्षकांचे वेतन, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा प्रत्येक कशा पुरवाव्यात, असा प्रश्न त्यांना पडला आहे. दृष्टिक्षेपात स्थितीआरटीईच्या नोंदणीकृत शाळा २३६आरटीईअंतर्गत प्रवेश २,३०५आरटीईची शासनाकडे थकीत रक्कम ४० कोटीशाळांना मिळालेली रक्कम ९१ लाख,चार वर्षांत मिळालेली रक्कम ३४ कोटी

टॅग्स :AmravatiअमरावतीTeacherशिक्षक