शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

‘डीपीसी’तून महापालिकेला ४ कोटी ६० लाख मंजूर

By admin | Updated: February 27, 2016 00:43 IST

जिल्हा नियोजन समितीने नगरसेवकांना विकासकामांसाठी सहायक अनुदान म्हणून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

पालकमंत्र्यांचा पुढाकार : प्रत्येक नगरसेवकाला विकासकामांसाठी मिळणार पाच लाख अमरावती : जिल्हा नियोजन समितीने नगरसेवकांना विकासकामांसाठी सहायक अनुदान म्हणून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरीता पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी पुढाकार घेतला असून ४ कोटी ६० लाख रुपये महापालिकेसाठी मंजूर करण्यात आले आहेत. हे अनुदान लवकरच महापालिकेला प्राप्त होण्याचे संकेत आहेत.जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडे गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत नगरसेवकांना प्रत्येकी पाच लाख रुपये विकासकामांसाठी वितरीत करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. या निधीतून प्रभागात आवश्यक आणि नागरिकांच्या हिताची विकासकामे करता येणार आहेत. महापालिकेला मूलभूत सुविधा, नगरोत्थान, अतिवृष्टी, रस्ते अनुदान अशा विविध शिर्षातंर्गत निधी प्राप्त होतो. मात्र, पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी महापालिका नगरसेवकांना विकासकामांसाठी निधी देण्याचे सकारात्मक पाऊल उचलले आहे. मागील जिल्हा नियोजन समितीत मंजूर करण्यात आलेल्या सहायक अनुदान वाटपाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिले होते. या निर्देशांचे पालन करण्यासाठी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी विकासकामांसाठी नगरसेवकांना ४ कोटी ६० लाख रुपये सहायक अनुदान मंजूर केल्याची माहिती दिली. या अनुदानातून मोठ्या स्वरुपाची कामे अपेक्षित आहेत. मात्र, पुढील वर्षी नगरसेवकांना सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जावे लागत असल्यामुळे समान निधी वाटप होणार असल्यामुळे नगरसेवकांना नागरिकांच्या हिताची कामे करावी लागणार आहेत. यापूर्वी महापालिका प्रशासनाने रस्ते अनुदानातून विशेष रस्ते निर्मितीवर खर्च करण्याचे नियोजन केले असले तरी या सहायक अनुदानातून पुन्हा लहान, मोठ्या रस्त्यांची कामे हाती घेतली जातील, अशी माहिती आहे. महापालिकेत एकूण ९२ सदस्य असून एका नगरसेवकाच्या वाट्याला पाच लाख येणार आहेत. अनुदानातून रस्ते निर्मितीसह इतर विकासकामे करता येतील. नगरसेवक सुचवतील त्याच विकासकामांवर हे अनुदान खर्च करावे लागेल. अनुदानातून कामे करण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. नगरसेवकांनी विकासकामांची यादी सादर केल्यास निविदा प्रक्रिया राबवून इस्टिमेट तयार करणे, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक बाबी पूर्ण केल्या जातील. (प्रतिनिधी)पालकमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षावपालकमंत्री प्रवीण पोटे अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थांमधून भाजपाचे आमदार आहेत. मात्र, महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता असताना देखील पालकमंत्री पोटे यांनी नगरसेवकांना प्रत्येकी पाच लाख रुपये सहायक अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीमधून अनुदान वाटपाच्या घेतलेल्या निर्णयाासाठी महापालिकेतील सत्तापक्षाने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. पालकमंत्री पोटे हे विकासात्मक दृष्टीने कामे करीत असल्याच्या प्रतिक्रिया काँग्रेस, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांकडून उमटू लागल्या आहेत.सहायक अनुदानाचे ४ कोटी ६० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. प्रत्येक नगरसेवकाला पाच लाख रुपये विकासकामांसाठी मिळतील. या अनुदानातून विविध विकासकामे हाती घेतली जाणार आहेत. सभागृहात याबाबत निर्णय होईल.- जीवन सदारअतिरिक्त शहर अभियंता, महापालिका.