‘गोडे’च्या विद्यार्थ्यांनी निर्मिले अद्ययावत ‘थ्रीडी प्रिंटर’
By Admin | Updated: May 31, 2016 00:26 IST2016-05-31T00:26:34+5:302016-05-31T00:26:34+5:30
अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन क्षेत्रात अग्रेसर असलेल्या डॉ. राजेंद्र गोडे इन्स्टिीट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, अमरावती ....

‘गोडे’च्या विद्यार्थ्यांनी निर्मिले अद्ययावत ‘थ्रीडी प्रिंटर’
क्रांती : मेकॅनिकल अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा अविष्कार,
अमरावती : अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन क्षेत्रात अग्रेसर असलेल्या डॉ. राजेंद्र गोडे इन्स्टिीट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, अमरावती येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थी व शिक्षक वर्गाद्वारे ‘अद्ययावत थ्रिडी प्रिंटर’चे संशोधन निर्माण करण्यात आले आहे.
विविध उपकरणांचे व पार्ट्सचे थ्रिडी प्रतिकृती (छोटे नमुने) तयार करण्यासाठी लागणारा अधिक पैसा, वेळ व त्यापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी राजेंद्र गोडे इंस्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, अमरावती येथील मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागाच्या विद्यार्थी व शिक्षक वर्गाद्वारे ‘अद्ययावत थ्रिडी प्रिंटर’चे संशोधन व निर्माण करण्यात आले आहे. हे थ्रिडी प्रिंटर सध्या बाजारात वापरले जाणाऱ्या थ्रिडी प्रिंटरपेक्षा स्वस्त व गतिमान राहील. त्यापासून बनविण्यात येणाऱ्या थ्रीडी प्रतिकृती तयार करण्यासाठी लागणारा वेळ व खर्च अतिशय कमी होणार आहे. या प्रिन्टरच्या संशोधन व निर्माणामुळे आता उद्योगक्षेत्रातील निर्मितीमध्ये नवीन क्रांती घडून येणार आहे. त्यामुळे बाजारात उपलब्ध थ्रीडी प्रिंटरच्या तुलनेत या थ्रीडी प्रिंटरची किंमत अत्यल्प राहणार आहे. याचा फायदा उद्योगक्षेत्रात होईलच. परंतु सामान्य जनतेलासुद्धा याचा फायदा होणार आहे. उद्योगात निर्मितीसाठी सबट्रॅक्शन मेथड’वापरण्यात येते. त्यामुळे प्रतिकृती तयार करताना लागणाऱ्या साहित्याचे मोठे नुकसान होते. परंतु या थ्रीडी प्रिंटरमध्ये अॅडीशन मेथड वापरण्यात आली आहे. त्यामुळे प्रतिकृती तयार करताना लागणाऱ्या साहित्याचे नुकसान होणार नाही. हे थ्रीडी प्रिंटर संगणकावरील एस. पद्धतीवर आधारित असून याचा उपयोग प्रतिकृती थर बाय थर तयार करण्यासाठी केला जातो. याची अचुकता ५० मायक्रॉन (केसाच्या जाडीपेक्षा अर्धी जाडी) इतकी आहे. याचे रिझोल्युशन १२०० पॉर्इंट पर इंच इतके उच्च कोटीचे आहे.
हे थ्रीडी प्रिंटर तयार करण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन क्षेत्रात सुप्रसिद्ध असलेले व २९ च्या वर पेटेंड ज्यांच्या नावे आहे, असे डॉ. व्हि.टी. इंगोले, संचालक, डॉ. राजेंद्र गोडे इंस्टीट्युट आॅफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, अमरावती व मेकॅनिकल विभागाचे विवेक डी.टांगे यांच्या मार्गदर्शनात अंतिम वर्षाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागामधील लोकेश सरोदे, तेजस बमनोटे, दीपेश बोरघाटे, आदित्य मिसाळ, रोहित खडसे आदी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
त्यांना प्राचार्य एस.जी. पाटील, विभागप्रमुख एस.एस. दांडगे, हेमंत आर. देशमुख, आर.एम. देशमुख, ए.पी.पचगाडे, शशिकांत देशमुख, अभिजित शहाडे यांनी कौतुक केले.