३६८ पुरूष ठरले कौटुंबिक अत्याचाराचे बळी
By Admin | Updated: January 24, 2016 00:16 IST2016-01-24T00:16:58+5:302016-01-24T00:16:58+5:30
समाजात सर्वाधिक अन्याय महिलांवर होतो़ ही सूर्यप्रकाशाएवढी सत्य बाब असली तरी तालुक्यात मागील पाच वर्षांत ३६८ पुरूष कौटुंबिक हिंसेचे बळी पडले असल्याची धक्कादायक महिती पुढे आली आहे.

३६८ पुरूष ठरले कौटुंबिक अत्याचाराचे बळी
नवरोबा बेपत्ता : पुरूषांसाठीही राष्ट्रीय आयोग स्थापन करण्याची मागणी
मोहन राऊ त धामणगाव रेल्वे
समाजात सर्वाधिक अन्याय महिलांवर होतो़ ही सूर्यप्रकाशाएवढी सत्य बाब असली तरी तालुक्यात मागील पाच वर्षांत ३६८ पुरूष कौटुंबिक हिंसेचे बळी पडले असल्याची धक्कादायक महिती पुढे आली आहे.
कुटुंबात पती-पत्नी ही संसाराची दोन चाके होत. गाडा हाकत असताना भविष्याच्या अनेक योजना राबविल्या जातात. दरम्यान, मोठी कसरत करावी लागते़ सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती मुलगा तथा मुलगी लहान असताना मुलांना इंजिनिअर, डॉक्टर करणे तसेच मोठ्या हुद्यावर नोकरी लागण्याचे स्वप्न पाहतात़ यासाठी कोणतेही कष्ट घेण्याची या जन्मदात्यांची तयारी असते़ परंतु वाढत्या महागाईत जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे ही स्वप्ने अर्ध्यावर तुटतात़ अशातच विविध कारणांवरून पती-पत्नीत वाद निर्माण होतात. यासोबतच एकमेकांविषयी द्वेष उत्पन्न झाल्याने पत्नी किंवा पती आत्महत्यासारखा चुकीचा पर्याय निवडला जातो़ यात महिलांची संख्या अधिक प्रमाणात असली तरी पुरूष झालेल्या तक्रारीवरून बळी पडतो़ धामणगाव तालुक्यात मंगरूळ दस्तगीर, तळेगाव दशासर, दत्तापूर या पोलीस ठाण्यासह तालुक्यातील काही गावांची हद्द चांदूररेल्वे व कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते़ मिळालेल्या पोलीस प्रशासनाच्या आकडेवारीवरून पती-पत्नीत वाद झाल्याने अनेक तक्रारीत पतीवर गुन्हा दाखल करण्याचे प्रकार मागील पाच वर्षांत घडले आहे़ पती घरी नसताना पत्नीने जाळून तथा विष घेऊन आत्महत्या केली असली तरी संब्ांधित पुरूषाविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे आकडेवारीवरून पहावयास मिळत आहे़ मागील पाच वर्षांत कौटुंबिक कलहातून आत्महत्या झाल्यामुळे ३६८ पुरूष या कौटुंबिक हिंसेचे बळी पडले आहे़ दररोज कौटुंबिक वाढता कलह पाहता ३४ नवरोबा कुटुंब सोडून गेले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे़ महिलांची आत्महत्या ही कुटुंब कलहातून झाली असल्याने संबंधित पती हा कुटुंबप्रमुख असल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल होणे ही स्वाभाविक बाब आहे़ परंतु अशा कारणाची चौकशी होणे महत्त्वाचे असल्याचे या प्रकरणाला बळी पडलेल्या पुरूषांची मागणी आहे़
पुरुषांसाठी आयोग स्थापन करा
मागील अनेक वर्षांपासून महिलांवर अत्याचार होत असल्याने शासनाने कठोर कायदा अस्तित्वात आणला़ त्यामुळे महिलांना संरक्षण मिळाले़ आजही महिलांची छळवणूक होत असल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात येतात़ परंतु या सर्व बाबींना संबंधित पुरूष किती जबाबदार आहे़, या बाबीची कारणमीमांसा शोधणे गरजेचे आहे. पुरूषांसाठी हे राष्ट्रीय आयोग स्थापन करावे, अशी मागणी जोर धरत आहे़