जलप्रकल्प क्षमतेच्या ३४ टक्के पाणीसाठा
By Admin | Updated: May 24, 2015 00:43 IST2015-05-24T00:43:35+5:302015-05-24T00:43:35+5:30
गतवर्षी पावसाळ्याच्या ३६ दिवसांत ७८० मि.मी. पाऊस पडला. एकूण सरासरी पावसाच्या तुलनेत ही टक्केवारी ९६ टक्के आहे. ...

जलप्रकल्प क्षमतेच्या ३४ टक्के पाणीसाठा
एकूण ७६ प्र्रकल्प : गतवर्षीच्या तुलनेत पाच टक्क्यांनी कमी साठा
गजानन मोहोड अमरावती
गतवर्षी पावसाळ्याच्या ३६ दिवसांत ७८० मि.मी. पाऊस पडला. एकूण सरासरी पावसाच्या तुलनेत ही टक्केवारी ९६ टक्के आहे. पाऊ स जरी कमी असला तरी मुख्य व मध्यम प्रकल्पांची साठवण क्षमता अधिक असल्याने जिल्ह्यातील एकूण ७६ प्रकल्पात सध्या ३४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत हा जलसाठा ५ टक्क्यांनी कमी आहे.
जिल्ह्यात एक मुख्य, चार मध्यम व ७१ लघुप्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांचा संकल्पि जलसाठा ८६६.१७ द.ल.घ.मी. आहे. या प्रकल्पात ३१९.९३ द.ल.घ.मी. जलसाठा आहे. गेल्या आठवड्यात हा साठा ३२९.८८ द.ल.घ.मी. होता. गेल्या वर्षी याच दिनांकात ३५६.१४ द.ल.घ.मी. जलसाठा होता.
या आठवड्यात तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्याने बाष्पीभवन झाले. त्यामुळे पाण्याच्या पातळीत १० टक्क्यांनी घट आली. २०१० ते २०१४ या ४ वर्षांत आज दिनांकात ३०९.१२ द.ल.घ.मी. सरासरी साठा होता. जिल्ह्यात एकमेव मुख्य प्रकल्प असणाऱ्या उर्ध्व प्रकल्पात प्रकल्पीय संकल्पित ५६४.०५ द.ल.घ.मी. साठ्याच्या तुलनेत १८४.२७ द.ल.घ.मी. जलसाठा आहे. ही ३२.६७ टक्केवारी आहे. गेल्या आठवड्यात १८८.९५ व गेल्या वर्षी या दिवशी २२५.८८ द.ल.घ.मी. जलसाठा होता.
जिल्ह्यात शहानूर, चंद्रभागा, सपन व पूर्णा या चार मध्यम प्रकल्पात प्रकल्पीय संकल्पित १६१.२६ द.ल.घ.मी. पाणी साठ्याच्या तुलनेत सध्या ९५.२१ द.ल.घ.मी. साठा शिल्लक आहे. ही ५९ टक्केवारी या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमिवर दिलासा देणारी आहे. गेल्या वर्षी याच दिनांकात ९८.३३ द.ल.घ.मी. जलसाठा शिल्लक होता.
७१ लघु प्रकल्पात पाण्याची साठवणक्षमता कमी आहे. प्रकल्पीय संकल्पीत १६१ द.ल.घ.मी. साठ्याच्या तुलनेत ९५ द.ल.घ.मी. साठा शिल्लक आहे.
बाष्पीभवनामुळे पातळीत झपाट्याने घट
या आठवड्यात तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. कडाक्याच्या उन्हामुळे प्रकल्पातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे. गेल्या आठवड्यातील मुख्य, मध्यम व लघु यासर्व प्रकल्पांची ३२९.८८ द.ल.घ.मी. जलसाठा होता. आठ दिवसात १० द.ल.घ.मी.पाण्याचे बाष्पीभवन झाले. सध्या ३१९.९३ द.ल.घ.मी. जलसाठा शिल्लक आहे. मुख्य प्रकल्पात ४, मध्यम ३ व लघुप्रकल्पात २ द.ल.घ.मी. पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे.