लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरिपाला तीन महिने झाले असताना अद्याप १,०७१ कोटींचे कर्जवाटप बाकी आहे. शेतकरी अडचणीत असताना बँका त्यांना कर्जपुरवठा करीत नसल्यानेच कर्जवाटपाचा टक्का माघारला. यंदा जिल्ह्यास १६३० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत ५७,८८६ शेतकऱ्यांना ५५८ कोटी ३७ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले. याची टक्केवारी ३४ एवढी आहे.सलग पाच वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी अडचणीत आहेत. शासनाने आतापर्यंत १.३१ लाख शेतकºयांची कर्जमाफी केली. या सर्व शेतकºयांचा सात-बारा कोरा केल्याचा शासनाचा दावा आहे. त्यामुळे या १.३१ लाख शेतकºयांसह ५० हजार नियमित कर्जदार व १० हजार नवे खातेदार, अशा एकूण दोन लाख शेतकºयांना बँकांनी कर्ज देण्यास कोणतीही अडचण नसताना कर्ज नाकारल्याचे वास्तव आहे. बँका शासन, प्रशासनाच जुमानत नाहीत, तर न्याय मागावा तरी कुणाला, असा शेतकºयांचा सवाल आहे.यंदाच्या खरिपासाठी जिल्ह्यातील बँकांना १,६३० कोटींचे लक्ष्यांक आहे. यातुलनेत आॅगस्ट अखेरपर्यंत ५७८८६ खातेदारांना ५५८.३७ कोटींचे वाटप केले. ही ३४ टक्केवारी आहे. यामध्ये व्यापारी बँकांना १,०९६ कोटींचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत ३६,२३६ शेतकºयांना ४००.२५ कोटींचे वाटप झाले आहे. वाटपाची ही ३७ टक्केवारी आहे. ग्रामीण बँकांना १४ कोटींचे लक्ष्यांक असताना ४१६ शेतकºयांना ३.७२ कोटींचे वाटप करण्यात आले, याची ३६ ही टक्केवारी आहे. शेतकºयांची बँक म्हणवणाºया जिल्हा बँकेला ५२० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना २१,२३४ शेतकºयांना १५४.४० कोटींचे कर्जवाटप करण्यात आलेले आहे याची ही ३० टक्केवारी आहे.कर्जवाटपात जिल्हा बँक माघारलीजिल्हा बँकेचे सर्वाधिक खातेदार असताना जिल्हा बँक सध्या कर्जवाटपात माघारली आहे. जून महिन्यात सर्वाधिक कर्जवाटप जिल्हा बँकेचे होते. नंतर मात्र, या बँकेने हात आखूडता घेतला. जुलैनंतर कर्जवाटपच थांबविले होते. वास्तविकता ७०,१४० खातेदारांच्या २९४ कोटींच्या कर्जमाफीनंतर जिल्हा बँकेचा एनपीए खूप कमी झाला असताना कर्जवाटपात कमी होत असल्याचे वास्तव आहे.दहाव्या ग्रीन लिस्टची प्रतीक्षाकर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात सद्यस्थितीत १,३०,९११ खातेदारांची ८०६ कोटी ७३ लाख २६ हजारांची कर्जमाफी करण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यात कर्जमाफीच्या नऊ ग्रीन लिस्ट जाहीर झाल्यात. जिल्ह्यात १,९७,७९१ शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज दाखल केले होते. अद्यापही किमान ५० हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे. या शेतकºयांना दहाव्या ग्रीन यादीची प्रतीक्षा आहे.
९० दिवसांत ३४ टक्केच पीककर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 22:09 IST
यंदाच्या खरिपाला तीन महिने झाले असताना अद्याप १,०७१ कोटींचे कर्जवाटप बाकी आहे. शेतकरी अडचणीत असताना बँका त्यांना कर्जपुरवठा करीत नसल्यानेच कर्जवाटपाचा टक्का माघारला. यंदा जिल्ह्यास १६३० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत ५७,८८६ शेतकऱ्यांना ५५८ कोटी ३७ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले. याची टक्केवारी ३४ एवढी आहे.
९० दिवसांत ३४ टक्केच पीककर्ज वाटप
ठळक मुद्देनियंत्रण कुणाचे? : सोयाबीन, मूग, उडदाचा हंगाम झाल्यागत