सव्वातीन हजार शेतकरी मोजणीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 05:00 AM2020-05-29T05:00:00+5:302020-05-29T05:00:09+5:30

शासकीय केंद्रावर कापूस विक्रीसाठी तालुक्यातील ३८९२ शेतकऱ्यांनी ठरलेल्या मुदतीत नोंद केली. यापैकी ६४३ शेतकºयांकडून लेहेगाव या एका केंद्रावर २६ मेपर्यंत कापूस नेण्यात आला. उर्वरित ३२४९ शेतकरी कापूसकोंडीत आहेत. एका केंद्रावर शंभर शेतकऱ्यांचा कापूस मोजणीचा आदेश असला तरी मजुरांची कमतरता, फिजिकल डिस्टन्सिंग यामुळे ही संख्या निम्म्याहून कमी आहे.

3250 farmers are waiting for the weighing | सव्वातीन हजार शेतकरी मोजणीच्या प्रतीक्षेत

सव्वातीन हजार शेतकरी मोजणीच्या प्रतीक्षेत

Next
ठळक मुद्देदोन केंद्रे वाढली : कामाची गती वाढवा; खरिपाच्या तोंडावर कापूस घरीच

लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : पेरणी तोंडावर आली असताना तालुक्यातील सव्वतीन हजार शेतकरी कापूस मोजणीच्या प्रतीक्षेत आहेत. खरेदीचा वेग वाढावा म्हणून आणखी दोन केंद्रे २७ मेपासून वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. ती सुरू झाली असून, यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या घरात कापूस आहे का, याची खारतजमा पथके नेमून केली जात असल्यामुळे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
शासकीय केंद्रावर कापूस विक्रीसाठी तालुक्यातील ३८९२ शेतकऱ्यांनी ठरलेल्या मुदतीत नोंद केली. यापैकी ६४३ शेतकºयांकडून लेहेगाव या एका केंद्रावर २६ मेपर्यंत कापूस नेण्यात आला. उर्वरित ३२४९ शेतकरी कापूसकोंडीत आहेत. एका केंद्रावर शंभर शेतकऱ्यांचा कापूस मोजणीचा आदेश असला तरी मजुरांची कमतरता, फिजिकल डिस्टन्सिंग यामुळे ही संख्या निम्म्याहून कमी आहे. यासाठी माहुली, शहापूर (वरूड) या केंद्रावर २७ मे पासून कापूस खरेदी सुरू असली तरी पावसाळ्यापूर्वी कापूस उचलणे कठीण झाले. पेरणी तोंडावर आली असताना विक्रीनंतरही चुकारे कधी मिळणार, याची चिंता शेतकऱ्यांना आहे.
दुसरीकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा घरात कापूस आहे का, याची खातरजमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी सहायक निबंधकांना दिले असून, त्यांनी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी कृषिउत्पन्न बाजार समितीकडून घेतली आहे. सत्यता पडताळणीसाठी पथके नेमली असून, ही पथके २७ मेपासून कामी लागल्याचे सांगण्यात आले. व्यापाऱ्यांचा कापूस मोजण्यासाठी शेतकºयांचे सातबारे वापरल्याची शक्यता नाकारता येत नाही. असे प्रकारही प्रशासनाला दिसून पडत आहेत. हे याआधी झाले असते, तर आज व्यापाºयांऐवजी अनेक शेतकरी कापूस विकून मोकळे झाले असते . या अभियानातून किती शेतकऱ्यांना न्याय मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
लेहेगाव केंद्रावर ३० ते ४० शेतकरी कापूस मोजणीसाठी बोलावले जात होते. २७ मे पासून माहुली आणि शहापूर (वरूड) ही दोन केंद्रे सुरू झाल्यामुळे निश्चितच खरेदीचा वेग वाढेल; परंतु सव्वातीन हजार नोंदी शिल्लक आहेत.
मोर्शी, हिवरखेड भागातील शेतकऱ्यांना शहापूर केंद्र दिले जाईल. माहुलीनजीकच्या शेतकऱ्यांना या केंद्रावर बोलावले जाईल. खरीप हंगामाच्या तोंडावर ही केंदे्र वाढली. कापूस निघाल्यावर सुरुवातीपासून शासनाने दखल घेतली असती, तर शेतकऱ्यांची लूट थांबली असती. शासकीय खरेदीचा भाव ५ हजार ५०० असला तरी व्यापारी ४२००, ४३०० रुपयांनी शेतकऱ्यांकडून कापूस मागत आहेत, शिवाय फरदड कापूस खरेदी करून शेतकऱ्यांच्या सात-बारावर विकत आहेत.

Web Title: 3250 farmers are waiting for the weighing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस