वरूडमध्ये एकाच दिवशी ३२५ पादचारी, वाहनचालकांच्या चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:11 IST2021-05-30T04:11:13+5:302021-05-30T04:11:13+5:30
वरूड : शहरातील महात्मा फुले व इंदिरा चौकात शुक्रवारी संचारबंदीच्या कालावधीत घराबाहेर पडणारे पादचारी व वाहनचालकांची फिरत्या पथकांद्वारे कोरोना ...

वरूडमध्ये एकाच दिवशी ३२५ पादचारी, वाहनचालकांच्या चाचण्या
वरूड : शहरातील महात्मा फुले व इंदिरा चौकात शुक्रवारी संचारबंदीच्या कालावधीत घराबाहेर पडणारे पादचारी व वाहनचालकांची फिरत्या पथकांद्वारे कोरोना चाचणी करण्यात आली. पोलीस, महसूल, नगर परिषद आणि आरोग्य विभागाने हा संयुक्त उपक्रम राबविला. एकच दिवशी ३२५ नागरिकांची चाचणी केली असता, तीन कोरोना पॉझिटिव्ह आढळले.
वैद्यकीय पथकांसह पोलीस यंत्रणा, महसूल कर्मचारी आणि नगर परिषद यांच्यावतीने वरूड शहरातील चौकाचौकांत कोविड तपासणी वाहनाद्वारे रस्त्यावरील नागरिकांची अँटिजेन आणि आरटी-पीसीआर चाचणी केली जात आहे . शुक्रवारी महात्मा फुले चौक आणि इंदिरा चौकात ३२५ नागरिकांची कोविड चाचणी करण्यात आली. यामध्ये तीन कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांना बेनोडा येथील कोविड रुग्णालयात पाठविण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमोल देशमुख, प्रभारी तहसीलदार देवानंद धबाले, दुय्यम ठाणेदार सुनील पाटील, नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी गौरव गाडगेंसह कर्मचारी उपस्थित होते. यामुळे अकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना चांगलाच चाप बसला आहे.