अमरावती जिल्ह्यात ३२ हजार कोंबड्या आज नष्ट करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:25 IST2021-02-28T04:25:06+5:302021-02-28T04:25:06+5:30
अमरावती : जिल्ह्यातील भानखेडा परिसरातील एका पोल्ट्री फार्मवरील कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचा अहवाल भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा ...

अमरावती जिल्ह्यात ३२ हजार कोंबड्या आज नष्ट करणार
अमरावती : जिल्ह्यातील भानखेडा परिसरातील एका पोल्ट्री फार्मवरील कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचा अहवाल भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने शनिवारी दिला. त्यामुळे या फार्मसह परिसरातील ३२ हजारांवर कोंबड्या पशुसंवर्धन विभागाच्या ४० पथकांद्वारा शास्त्रीय पद्धतीने नष्ट करण्यात येणार आहेत.
अमरावतीचे एसडीओ उदयसिंग राजपूत यांनी तसे आदेश शनिवारी काढले आहेत. सर्वेक्षण क्षेत्रात बाहेरून येणारे किंवा तिथून बाहेर पाठविण्यात येणारे चिकन प्रक्रिया उत्पादने, कुक्कुटपक्षी खाद्य व अंडी यांची हालचाल, विपणन व विक्रीवर तीन महिने बंदी लागू राहील, असे आदेशात नमूद आहे. याशिवाय या परिसराच्या एक कि. मी. त्रिज्येच्या परिघात क्षेत्र संक्रमित क्षेत्र व १० किमी त्रिज्येच्या परिघात सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आले असल्याची माहिती जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. विजय राहाटे यांनी दिली. ११फेब्रुवारीला अज्ञात ईसमाने या भागात ५० मृत कोंबड्या फेकल्या होत्या व त्यांचे नमुने पुणे व भोपाळ येथे तपासणीला पाठविल्यानंतर बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आल्यानंतर या परिसरात सर्वेक्षण करण्यात येऊन नमुने तपासणीला पाठविले होते.