शहरं
Join us  
Trending Stories
1
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
2
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
3
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
4
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
5
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
6
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
7
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
8
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
9
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
10
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
11
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
12
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
13
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
14
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
15
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
16
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
17
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
18
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
19
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
20
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान

३१ व्यक्ती मृत, ५५२ रेस्क्यू, ९४८६ विस्थापित; पश्चिम विदर्भात आठवडाभरात १९० मंडळांमध्ये अतिवृष्टी 

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: July 26, 2023 18:03 IST

पश्चिम विदर्भात आठवडाभरात काही मंडळांमध्ये पहिल्यांदा ढगफुटीसदृश पाऊस झाला.

अमरावती: पश्चिम विदर्भात आठवडाभरात काही मंडळांमध्ये पहिल्यांदा ढगफुटीसदृश पाऊस झाला. तब्बल ३७ तालुक्यांसह १९० महसूल मंडळांमध्ये हाहाकार उडाला होता. या आपत्तीमध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला. १९ गावांमधील ५५२ नागरिकांना रेस्क्यू करण्यात आले आहे. याशिवाय ९४८६ नागरिक विस्थापित झाल्याने त्यांना तात्पुरत्या निवाऱ्यामध्ये आसरा घ्यावा लागल्याचा विभागीय आयुक्त कार्यालयाचा प्राथमिक अहवाल आहे.

विभागामध्ये २१ व २२ जुलै रोजी यवतमाळ, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात पावसाने कहर केला होता. नदी-नाल्यांना पूर आल्याने पुराचे पाणी गावात, शेतांत शिरले. त्यामुळे सर्वाधिक यवतमाळ जिल्ह्यात १०, अकोला जिल्ह्यातील ५ व बुलडाणा जिल्ह्यातील ४ तालुके बाधित झाले. या गावांतील तब्बल ५५२ नागरिकांना एसडीआरएफ व डीडीआरएफच्या बचाव पथकाने रेस्क्यू करून सुरक्षित बाहेर काढले आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात २९०, बुलडाणा जिल्ह्यात २३२ व अकोला जिल्ह्यातील ३२ जणांचा समावेश आहे. ६१७९४७ हेक्टर शेती बाधितअमरावती जिल्ह्यात ४४८७४ हेक्टर, अकोला १४२७८२ हेक्टर, यवतमाळ २.१८ लाख हेक्टर, वाशिम ४७६४३ व बुलडाणा जिल्ह्यात १६४६७७ हेक्टर बाधित झालेले आहे. यामध्ये २२४०३ हेक्टर शेती पुरामुळे खरडून गेलेली आहे. याशिवाय पाच जिल्ह्यांतील ७२ रस्ते व नदी-नाल्यांवरील ११८ पुलांचे मोठे नुकसान झालेले आहे. 

टॅग्स :AmravatiअमरावतीVidarbhaविदर्भRainपाऊसfloodपूरFarmerशेतकरी