शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या ३१ कर्मचाऱ्यांची वेतनकपात

By admin | Updated: April 7, 2017 00:12 IST

मनपातील ६१ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा आसूड ओढल्यानंतर दुसऱ्या दिवशीही कारवाईचा सिलसिला कायम राहिला.

आयुक्त आक्रमक : लेटलतिफांचे धाबे दणाणलेअमरावती : मनपातील ६१ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा आसूड ओढल्यानंतर दुसऱ्या दिवशीही कारवाईचा सिलसिला कायम राहिला. उपायुक्तद्वयांच्या पाहणीत गैरहजर ३१ कर्मचाऱ्यांची एक दिवसाची वेतनकपात करण्यात आली. बुधवारी ६१ कर्मचाऱ्यांचे वेतन कापण्याचे आदेश आयुक्त पवार यांनी दिले होते.दहाच्या ठोक्याला कार्यालयात पोहोचणाऱ्या आयुक्तांना अधिनस्थ यंत्रणा सकाळी दहालाच हजर हवी आहे. मात्र, मागील काही दिवसांत बहुतेक कर्मचारी सकाळी दहा वाजता कार्यालयात पोहोचत नसल्याचे निरीक्षण नोंदवून आयुक्तांनी त्यासाठी कार्यालयीन परिपत्रक काढले. मात्र,अनेकांनी त्या परिपत्रकाला वाटाण्याच्या अक्षता लावल्याने लेटलतिफांवर कारवाई करण्यात आलीे. गुरूवारी उपायुक्तद्वय औगड व वानखडे यांनी सकाळच्या सत्रात बाजार परवानासह झोन क्र. ३,निलंबित कर्मचाऱ्यांसह एनयूएलएम विभागाचा आढावा घेतला. यात ३१ कर्मचारी गैरहजर आढळले. यात ७ निलंबित कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. उपायुक्त सामान्य नरेंद्र वानखडे यांनी तसा अहवाल दिल्यानंतर उपरोक्त कर्मचाऱ्यांची ६ एप्रिलची अनुपस्थिती विनावेतन करण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाने याची नोंद घेऊन एप्रिलच्या वेतनातून उपरोक्त कर्मचाऱ्यांची एक दिवसाची वेतनकपात करण्यात यावी व तसा पूर्तता अहवाल सादर करावा, असा आदेश आयुक्तांनी गुरूवारी पारित केले. तर पूर्वसूचनेशिवाय वेतनकपात अधिकारी-कर्मचारी कार्यालयीन वेळेवर कार्यालयात उपस्थित होत नाहीत व त्याअनुषंगाने वेळोवेळी सूचना व निर्देश देण्यात आले आहेत. तरीही बहुतांश अधिकारी-कर्मचारी हे विहित वेळेत कार्यालयात उपस्थित होत नाहीत. हे विचारात घेता यापुढे विहित वेळेत उपस्थित न होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस अथवा कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांचे त्यादिवसाचे वेतन देय होणार नाही, असे आयुक्त हेमंत पवार यांनी स्पष्ट केले आहे.