पांढुर्ण्याच्या गोटमार यात्रेत ३०० जखमी, १७ गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 10:12 IST2022-08-29T10:12:18+5:302022-08-29T10:12:42+5:30
वरूड येथून ३५ किमी अंतरावर मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथे रविवारी अनेक वर्षांपासून सुरू असलेली गोटमार यात्रा पार पडली.

पांढुर्ण्याच्या गोटमार यात्रेत ३०० जखमी, १७ गंभीर
- संजय खासबागे
वरूड (जि. अमरावती) : येथून ३५ किमी अंतरावर मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथे रविवारी अनेक वर्षांपासून सुरू असलेली गोटमार यात्रा पार पडली. सावरगाव आणि पांढुर्ण्याच्या भाविकांमध्ये जाम्ब नदीतील झेंडा बळकावण्याच्या चढाओढीत यंदा दगडांच्या माराने ३०० भाविक जखमी झाले.
१७ गंभीर रुग्णांपैकी चौघांना नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
एका आख्यायिकेच्या आधारावर सावरगाव आणि पांढुर्ण्याच्या भाविकांमध्ये जाम्ब नदीतील पळसाचा झेंडा काढण्याकरिता गोटमार होते.