शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

राज्यात 30 हजार कोटींचे रस्ते पहिल्यांदाच- चंद्रकांतदादा पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2017 8:39 PM

अमरावती : सरकारने तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासात्मक हाती घेतले असून राज्य शासनाने रस्ते विकासासाठी ३० हजार कोटी रूपये मंजूर केले आहे. यापूर्वी तीन हजार कोटींच्यावर रस्त्यांवर बजेट नव्हते, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

अमरावती : सरकारने तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासात्मक हाती घेतले असून राज्य शासनाने रस्ते विकासासाठी ३० हजार कोटी रूपये मंजूर केले आहे. यापूर्वी तीन हजार कोटींच्यावर रस्त्यांवर बजेट नव्हते, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.येथील मुख्य अभियंता कार्यालयाच्या सभागृहात रविवारी या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातील बांधकाम विभागाच्या सर्व अभियंत्यांची त्यांनी बैठक घेऊन कामांचा आढावा घेतला. यावेळी रस्त्यांचा १० हजार किमींचा होत असलेल्या रस्त्याचा आढावा व हायब्रीड तत्त्वावरील रस्त्यांचाही त्यांनी माहिती घेतली. 'राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये मी आढावा घेत आहे. जेई टु ईई यांच्या समस्या व त्यांना काम करताना येत असलेली अडचण मी जाणून घेत आहे', असे ना.पाटील म्हणाले. रस्त्यांची ईफिसिएन्सी व लॉयल्टी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी चर्चा करण्यात येत आहे.महाराष्ट्रात यापूर्वी ५ हजार किमीचे नॅशनल हायवे होते. गेल्या तीन वर्षांत दिल्लीत चकरा मारून व रस्त्यांच्या कामांचा पाठपुरवा करून ते २२ हजार किमीचे नॅशनल हायवे मंजूर करवून घेतले. २२ हजार किमीच्या नॅशनल हायवेला १ लाख ६ हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी २० हजार कोटी आतापर्यंत प्राप्त झाले असून ते पैसे रस्त्यांच्या भूसंपादनासाठी उपयोगात येणार आहेत. तीन वर्षांत सदर रस्ते पूर्ण करण्यात येणार आहे.इतिहासात पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाने रस्त्यांच्या कामांसाठी ३० हजार कोटी रूपये मंजूर केले आहे. रस्त्यांच्या कामाचे यापूर्वीचे बजेट कधीही तीन हजार कोटींच्यावर नव्हते. १० हजार किमीचे थ्री लाईन व नॅशनल हायवेची फोरलाई होती. महाराष्ट्रातील साडेसहा हजार किमीचे रस्ते नव्याने करण्यासाठी केंद्र शासनाने घेतले ते त्यांचे सहा पदरीकरण करणार आहेत. हे रस्ते जर रस्ते झाले, तर १५ ते २० वर्षांपर्यंत या रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांची लांब ही आता ९६ हजार किमी झाली आहे. तोपर्यंत या रस्त्यांना मेंटनन्स करणे आवश्यक आहे. आढावा बैठकीला विभागीय आयुक्त पीयूष सिंग, आ. अनिल बोंडे, मुख्य अभियंता चंदशेखर तुंगे, अधीक्षक अभियंता विवेक साळवे आदी उपस्थित होते. यावेळी सर्व कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता व सार्वजनिक बांधकाम विभागाचे महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते.पॉझिटिव्ह काम करण्याचे अधिका-यांना आवाहनसर्व अधिका-यांनी पॉझिटिव्ह काम करा, खड्यांचे कामेही पॉझिटिव्ह होतील, असा कानमंत्रही ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला. आपण जर चांगले काम केले तर त्यांचे समाधान व आनंद वेगळा मिळतो. अमरावतीच्या बाजारात आनंद विकत मिळतो काय, असा प्रश्न ना. पाटील यांनी करताच बैठकीत हशा पिकला. ना. पाटील यांनी खेळीमळीच्या वातावरणात अधिकाºयांशी संवाद साधत त्यांची अडचणी व समस्या जाणून घेतली. प्रास्ताविक मुख्य अभियंता चंद्रशेखर तुंगे यांच्या हस्ते करण्यात आले.मोबाईल फिल्ड लॅबचे उद्घाटनयावेळी ना. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मोबाईल फिल्ड लॅबचे उद्घाटन करण्यात आले. ही मोबाईल फिल्ड लॅब कुठल्याही कामांवर जाऊन कामांचे गुणनियंत्रण करणार आहे. यावेळी फित कापून त्यांनी उदघाटन केले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलAmravatiअमरावती