शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
3
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
4
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
5
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
6
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
7
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
8
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
9
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
10
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
11
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
12
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
13
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
14
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
15
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
16
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
17
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
18
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
19
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
Daily Top 2Weekly Top 5

वडाळी-चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रात ३० बिबट

By admin | Updated: January 10, 2017 00:07 IST

जैवविविधतेने परिपूर्ण असलेल्या वडाळी व चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रात तब्बल ३० बिबटांचे अस्तित्व असल्याचा दावा जीवनरक्षा बहुउद्देशीय संस्थेने सर्वेक्षणातून केला आहे.

जीवनरक्षा बहुउद्देशीय संस्थेचे सर्वेक्षण : अभयारण्याचा प्रस्ताव रखडलावैभव बाबरेकर अमरावतीजैवविविधतेने परिपूर्ण असलेल्या वडाळी व चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रात तब्बल ३० बिबटांचे अस्तित्व असल्याचा दावा जीवनरक्षा बहुउद्देशीय संस्थेने सर्वेक्षणातून केला आहे. शहरालगतच्या समृद्ध जंगलात वाघासह विविध वन्यप्राण्यांचा अधिवास असतानाही अभयारण्याचा प्रस्ताव शासनाकडे रखडला आहे. शहरालगतचे वडाळी व चांदूररेल्वे वनपरिक्षेत्र २१ हजार ४८५ हेक्टरमध्ये पसरले आहे. इतक्या विस्तिर्ण जंगलात वन्यप्राण्यांच्या विविध प्रजाती, पक्षी व वनस्पती आहेत. जैवविविधतेने परिपूर्ण या जंगलात वाघाचे अस्तित्वही सिद्ध झाले आहे. या जंगलाचे संवर्धन व वन्यप्राण्यांच्या सुरक्षेच्या उद्देशाने जीवनरक्षा बहुउद्देशीय संस्था सातत्याने कार्यरत आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सन २०१५-१६ मध्ये रात्री १० ते पहाटेपर्यंत वडाळी व चांदूररेल्वे वनपरिक्षेत्राचे सर्वेक्षण करून वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करून वन्यप्राण्यांची मोजणी केली आहे. त्यामध्ये अतिशय धक्कादायक माहिती हाती लागली आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पोहरा, भानखेडा, मालखेड, रत्नापूर, बोडणा, रजनीशपुरम (इंदला), चिरोडी, पिपंळखुटा, भिवापूर, कारला,वन्यप्राणी-मानव संघर्षाच्या घटना नाहीतअमरावती : आमला, उतखेड, जेवड बिट, अंजनगाव बारी, मार्डी, माळेगाव व कुऱ्हा या जंगलात फिरून सर्वेक्षण केले. त्यात ३० बिबट ‘सायटिंग’ झाले. तशी नोंद संस्थेने सर्वेक्षण अहवालात केली असून तो अहवाल वनविभागाला पाठविला आहे. वडाळी व चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रात वन्य प्राण्यांसाठी पोषक वातावरण व त्यांना मुबलक खाद्यपदार्थ उपलब्ध होत असल्यामुळे याजंगलात वन्यप्राण्यांची संख्या वाढल्याचे संस्था पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. ही बाब वन्यप्रेमींसाठी आनंददायी ठरली असून नागरिकांनीही वन्यप्राण्यांची भीती न बाळगता जंगल व वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी पाऊल उचलणे आता गरजेचे झाले आहे. यावन्यप्राण्यांनी गावकऱ्यांची जनावरे फस्त केली आहेत. मात्र, मागील चार ते पाच वर्षांत वन्यप्राणी व मानवी संघर्षाच्या घटना घडल्या नसल्याचे मत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वर्तविले आहे. (प्रतिनिधी)जंगल वाचविण्याचे ध्येयजीवनरक्षा बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी खासगी कामे करून जंगल वाचविण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. संस्थाध्यक्ष सागर मैदानकर, उपाध्यक्ष राम खरबडे, मिलिंद वानखडे, प्राजक्ता बहादेकर, समीर कावरे, योगेश दंडाळे, सागर फुटाणे आदी पदाधिकारी जंगल संर्वधन व वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी धडपड करीत आहेत. अभयारण्याचा दर्जा केव्हा ?जिल्ह्यातील मेळघाटचे जंगल हे जैवविविधतेने समृद्ध आहे. अमरावती शहरालगतचे जंगलही आता समृद्ध झाले आहे. त्यामुळे वाघ, बिबटांसह अन्य वन्यप्राण्यांची संख्या वाढली आहे. या समृद्ध जंगलाला अभयारण्याचा दर्जा मिळावा, यासाठी काही वर्षांपूर्वी वन्यप्रेमींनी शासनदरबारी प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, अद्याप त्या प्रस्तावावर सकारात्मक पाऊल उचलले गेले नाही. तो प्रस्ताव शासनदरबारी रखडला आहे. त्यामुळे या जंगलाला अभयारण्याचा दर्जा केव्हा मिळणार, याची प्रतीक्षा वन्यप्रेंमींसह जिल्ह्यातील सामान्य नागरिकांनादेखील लागून राहिली आहे. सुरक्षा शक्यजंगलाच्या सुरक्षेसाठी वनविभाग सातत्याने काम करीत आहे. मात्र, यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी जंगलात जाणे टाळावे, शेतातील रस्ते स्वच्छ ठेवावेत, जेणे करून वन्यप्राणी लवकरच दृष्टीस पडू शकेल, शेतात काम करताना सावध राहावे, घंटा जवळ बाळगून आवाज करावा. उघड्यावर शौचास न बसता शौचालयाचा उपयोग करावा. जंगल मार्गाने दुचाकीने ये-जा प्रवास करण्याचे टाळावे.वनविभागामार्फत झालेल्या सर्वेक्षणात चांदूररेल्वे व वडाळीच्या जंगलात १६ बिबटांची नोंद मे २०१६ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात घेण्यात आली. त्या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाविषयी मला काही सांगता येणार नाही.- हेमंतकुमार मीना, उपवनसरंक्षक, अमरावती वनविभाग.