बग्गी येथील ३ लाखांचा जुगार उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:16 IST2021-09-04T04:16:54+5:302021-09-04T04:16:54+5:30

अमरावती : तळेगाव दशासर पोलिसांनी बग्गी येथील जुगारावर धाड घालून सुमारे ३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. २ ...

3 lakh gambling at Buggy destroyed | बग्गी येथील ३ लाखांचा जुगार उद्ध्वस्त

बग्गी येथील ३ लाखांचा जुगार उद्ध्वस्त

अमरावती : तळेगाव दशासर पोलिसांनी बग्गी येथील जुगारावर धाड घालून सुमारे ३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. २ सप्टेंबर रोजी ठाणेदार अजय आकरे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी प्रवीण दामाजी उरकुडे (४५), मनोहर ज्ञानेश्वर वैद्य (५०), संतोष गुलाबराव गोडबोले (३६), अक्षय दिलीप स्वर्गे (२४, सर्व रा. बग्गी) व प्रशांत यशवंत गणवीर (३७, रा. निंभा) यांना अटक करण्यात आली.

आरोपींकडून १० हजार ३२० रुपये रोख, २ लाख ६० हजार रुपये किमतीच्या ५ दुचाकी व ३१ हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल असा एकूण ३ लाख १ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई अंमलदार संतोष सांगळे, मनीष आंधळे, श्यामकुमार गावंडे, पवन महाजन, संदेश चव्हाण, मनीष कांबळे, अंकुश पाटील, संजय राऊत यांनी केली.

Web Title: 3 lakh gambling at Buggy destroyed