४३ अतिरिक्त शिक्षकांना अखेर मिळाली नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 06:00 IST2019-09-21T06:00:00+5:302019-09-21T06:00:49+5:30
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या सन २०१८-१९ मधील संचमान्यतेनुसार तालुकास्तरावरील अतिरिक्त शिक्षकांच्या नियुक्तीसाठी १८ सप्टेंबरला तालुकास्तरावर पंचायत समितीत समुपदेशन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतरही अतिरिक्त असलेल्या शिक्षकांचे जिल्हास्तरावर सीईओंच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने समुपदेशनाद्वारे नियुक्तीची प्रक्रिया राबविली.

४३ अतिरिक्त शिक्षकांना अखेर मिळाली नियुक्ती
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सन २०१८-१९ च्या संचमान्यतेनुसार तालुकास्तरावर अतिरिक्त ठरलेल्या तसेच सन २०१९ मधील आॅनलाइन बदली प्रक्रियेतील अतिरिक्त ठरलेल्या ४३ शिक्षकांना समुपदेशनाद्वारे मेळघाटसह अन्य ठिकाणी रिक्त जागांवर नियुक्तीची प्रक्रिया २० सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत पार पडली. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रिया देशमुख, उपशिक्षणाधिकारी नितीन उंडे आदींनी सन २०१८-१९ च्या संचमान्यतेनुसार पदस्थापना देऊन हा तिढा निकाली काढला.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या सन २०१८-१९ मधील संचमान्यतेनुसार तालुकास्तरावरील अतिरिक्त शिक्षकांच्या नियुक्तीसाठी १८ सप्टेंबरला तालुकास्तरावर पंचायत समितीत समुपदेशन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतरही अतिरिक्त असलेल्या शिक्षकांचे जिल्हास्तरावर सीईओंच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने समुपदेशनाद्वारे नियुक्तीची प्रक्रिया राबविली. ४३ शिक्षकांना समुपदेशनाद्वारे जिल्ह्यातील रिक्त जागांवर नियुक्ती देण्यात आली. यामध्ये पदवीधर, सहायक शिक्षक, मुख्याध्यापक आदी मराठी व उर्दू माध्यमातील शिक्षकांचा समावेश आहे.
यावेळी नितीन उंडे, संदीप बोडखे आदी अधिकाऱ्यांसह तुषार पावडे, ऋषीकेश कोकाटे, राजीव झाकर्डे, सुभाष चव्हाण, गजानन कोकाटे, दिनेश बांबल, विनोद विखार आदीसह सर्व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.
अनुशेष भरुन निघाला
सन २०१८-१९ च्या संचमान्यतेनुसार तालुकास्तरावर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना समुदपदेशनाद्वारे पदस्थापना देण्याची कारवाई करण्यात आली. यामध्ये बहुतांश शिक्षकांना मेळघाटातील रिक्त असलेल्या शाळांतील जागांवर नियुक्ती देण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे प्रशासकीयदृष्ट्या मेळघाटातील सहायक शिक्षकांचा रिक्त पदांचा अनुशेष कमी झाल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.