२९ वर्षीय विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:12 IST2021-08-01T04:12:53+5:302021-08-01T04:12:53+5:30

--------------- क्षुल्लक कारणावरून शेतकऱ्यांमध्ये हाणामारी चांदूर रेल्वे : तालुक्यातील लालखेड शिवारात सूरज रमेश चव्हाण याने शेतातून टाकलेला इलेक्ट्रिक तार ...

29-year-old married woman persecuted | २९ वर्षीय विवाहितेचा छळ

२९ वर्षीय विवाहितेचा छळ

---------------

क्षुल्लक कारणावरून शेतकऱ्यांमध्ये हाणामारी

चांदूर रेल्वे : तालुक्यातील लालखेड शिवारात सूरज रमेश चव्हाण याने शेतातून टाकलेला इलेक्ट्रिक तार काढून घ्या, असे म्हणताच आरोपी रोहित अरुण चव्हाण याने डोक्यावर वीट मारून जखमी केले. त्याच्यासह अरुण सवय चव्हाण व एका महिलेविरुद्ध चांदूर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

-----------------

लालखेड येथे शेतकऱ्यावर चाकुहल्ला

चांदूर रेल्वे : तालुक्यातील लालखेड येथे तुरीचे पैसे मागितले म्हणून सूरज रमेश चव्हाण याने ३७ वर्षीय महिलेच्या मुलावर चाकू उगारला. पती आडवे गेल्याने त्यांच्या अंगठ्याला तसेच सूरजलाही चाकू लागला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून सूरजसह रमेश चव्हाण व एका महिलेविरुद्ध चांदूर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

----------

बनावट ‘जीवनसाथी’ने उकळली रक्कम

धारणी : तालुक्यातील शिरपूर येथील २९ वर्षीय युवतीला वेब साईटद्वारे अर्पितकुमार (रा. अंबुर) व एका मोबाईलधारकाने बनावट सर्व्हिस एजंट बनून ऑनलाईन पद्धतीने १३ हजार रुपयांनी गंडविले. ६ जून रोजीची ही घटना आहे. याप्रकरणी धारणी पोलिसांनी दोघांविरुद्ध ३० जुलै रोजी गुन्हा दाखल केला.

Web Title: 29-year-old married woman persecuted