ग्रामीण हद्दीतील २९, शहरातील ६५ आरोपी तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:27 IST2019-04-01T23:27:15+5:302019-04-01T23:27:29+5:30

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी शहर व ग्रामीण पोलीस विभागाने आतापर्यंत ९४ आरोपींना तडीपार केले. यामध्ये शहर पोलिसांनी ६५, तर ग्रामीण हद्दीतील पोलिसांनी २९ आरोपींना तडीपार करून त्यांचे स्थानांतरण केले आहे.

29 in rural areas, 65 accused in the city | ग्रामीण हद्दीतील २९, शहरातील ६५ आरोपी तडीपार

ग्रामीण हद्दीतील २९, शहरातील ६५ आरोपी तडीपार

ठळक मुद्देनिवडणुकीची पार्श्वभूमी : कायदा, सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांची कारवाई

अमरावती : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी शहर व ग्रामीण पोलीस विभागाने आतापर्यंत ९४ आरोपींना तडीपार केले. यामध्ये शहर पोलिसांनी ६५, तर ग्रामीण हद्दीतील पोलिसांनी २९ आरोपींना तडीपार करून त्यांचे स्थानांतरण केले आहे.
निवडणुकीत गुन्हेगारी प्रवृत्तीचे आरोपी हे कायदा व सुव्यस्थेला बाधा पोहचवून उपद्रवमूल्य जगजाहीर करण्याची शक्यता असते. अशावेळी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असते. अशा गुन्हेगारांवर प्रतिबंध लावण्यासाठी शहर व ग्रामीण पोलीस विभागाने तडीपारीचे प्रस्ताव तयार केले होते. शहर पोलिसांनी एकूण ७१ जणांचे प्रस्ताव तयार केले होते. त्यापैकी आतापर्यंत ६५ आरोपींना तडीपार करण्यात आले आहे. तर ग्रामीण पोलिसांनी २०१२ ते २०१९ पर्यंतच्या मंजूर तडीपार प्रस्तावात एकुण २९ आरोपींचे तडीपारीचे आदेश काढले आहेत. यामध्ये अचलपूर उपविभागातील २० आरोपींचे तडीपारीचे आदेश निघाले आहे. याशिवाय अमरावती ग्रामीण उपविभागात तीन, चांदूर रेल्वे दोन, मोर्शी एक, दर्यापूर दोन अंजनगाव सुर्जी एक अशी तडीपारांची संख्या आहे.
चांदूरबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहम्मद राजीक हसन मो. युसूफ, सुभान अली अजमत अली, साबीर खाँ नासीर खाँ, शेख जाकीर शेख पापा, रमेश नामदेव तरारे, नासीर खाँ हिदायत खाँ, शाहिद खाँ असद खाँ, सरमसपुरा येथे सुरेश विष्णू नांदणे, मंगेश किसन डाहे, प्रमोद चिरंजीलाल पुरोहीत, ब्राम्हणवाडा येथे विनोद गणेश तायडे, किशोर रामभाऊ पटिले, अरशोद्दीन हसनोद्दीन, फिरोज खाँ अय्यूब खाँ पठाण, संजय फगण उईके, वसिम्मोद्दीन खैराद्दीन ईनामदार, शिरजागाव कस्बा येथे गणेश पंजाब वानखडे, शब्बीर खाँ, अजय मनोहर लवटे, आसेगाव पूर्णा येथे पन्ना ऊर्फ फिरोज खाँ रहिम खाँ, अब्दुल तारीक ऊर्फ राजा अब्दुल, खोलापूरमध्ये राजू ऊर्फ राजेंद्र दिगंबर उमप, चांदूर रेल्वे येथे अंकुश तिरमारे, संतोश ऊर्फ डॅनी मारुती घावडे, शिरखेड येथे प्रफुल विठ्ठल दापूरकर, येवदा येथे मुन्ना ऊर्फ स्वप्निल अजाब खरपे, दर्यापूर येथील नाजीमोद्दीन शरफोद्दीन, अंजनगाव सुर्जीतील विकास किसन पांडे यांचा तडीपार आरोपींमध्ये समावेश आहे. धारणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एकही तडीपार नाही.

Web Title: 29 in rural areas, 65 accused in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.