शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

२.७४ लाख शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 12:41 IST

१८ हप्त्यांचा लाभ आतापर्यंत मिळाला : योजनेत पुन्हा निकष, लाभार्थी होणार कमी

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता ई-केवायसी व आधार लिंकिंग केलेल्या २.७४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा करण्यात येणार आहे. त्यानंतरचा २० वा हप्ता मात्र कुटुंबातील फक्त एका व्यक्तीलाच मिळणार असल्याची प्रशासनाची माहिती आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक मदत होण्यासाठी केंद्र शासनाने पीएम किसान योजना डिसेंबर २०२४ पासून सुरू केली. या योजनेत वर्षाला सहा हजार रुपयांची मदत पात्र शेतकऱ्यांना देण्यात येते. यामध्ये वर्षात तीन वेळा प्रत्येकी चार महिन्यांत दोन हजारांचा हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येतो. योजनेचे आतापर्यंत १८ हप्ते जमा करण्यात आलेले आहेत. फेब्रुवारी महिन्यात १९ वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची चर्चा प्रशासनात आहे. 

योजनेत तालुकानिहाय पात्र लाभार्थी योजनेमध्ये ई-केवायसी व आधार लिकिंग केलेले २,७३,९७१ शेतकरी आहेत. यामध्ये अचलपूर तालुक्यात २२,६२८ शेतकरी, अमरावती १६,२८७, अंजनगाव सुर्जी १९,३३१, भातकुली १६,१४०, चांदूर रेल्वे १३,८८३, चांदूरबाजार २६,५४६, चिखलदरा १०,५६८, दर्यापूर २४,३२०, धामणगाव १८००२, धारणी १६,५७१, मोर्शी २५,१०६, नांदगाव खंडेश्वर २२,७७०, तिवसा १५,२८७ व वरुड तालुक्यात २६,५३० शेतकरी आहेत. 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरीfarmingशेतीAmravatiअमरावती