शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

मोर्शी तालुक्यात २६ गावांना कोरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 01:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मोर्शी : तालुक्यातील एकूण १६६ गावांपैकी २६ गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्या गावांमध्ये सात ...

ठळक मुद्दे७० गावे पाणी पुरवठा योजना बंद। सहा गावात टँकर, इतर गावातील सुविधांचे काय?

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : तालुक्यातील एकूण १६६ गावांपैकी २६ गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्या गावांमध्ये सात दिवसाआड पाणीपुरवठा होत असून, सहा गावांमध्ये शासकीय टँकर लावण्यात आले आहेत. प्रशासनाने ४४ विहिरी अधिग्रहीत केल्यात. लेहेगाव, सावरखेड, आसोना, वाघोली, पोरगव्हान, आखतवाडा या सहा गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.तालुक्यातील १० गावांमध्ये ८ ते १० दिवसाआड, तर काही ग्रामपंचायतीकडून चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. तालुक्यातील ७० गावे पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने पाणीटंचाई जहाल झाली. गावोगावी आंदोलने उभारली गेली. मात्र, प्रशासनाचे नियोजन टँकरपुरते मर्यादित राहिले. सध्या मोर्शी तालुक्यातील उतखेड, भिलापूर, उमरखेड, शिरजगाव, खेड, डोमक, धानोरा, आखतवाडा, पोरगव्हाण, वाघोली, लेहगांव, आसोना, पिंपळखुटा (लहान), इनापूर, सायवाडा, अंबाडा, पाळा, रिध्दपूर, बोडना, बेलोना, वºहा, कमळापूर, निंभोरा, लाखारा, आष्टगाव, शिरखेड, सावरखेड, गोराळा, ब्राम्हणवाडा, कोळविहीर या गांवात तीव्र पाणी टंचाई भासत आहे. गावकऱ्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे.दोन वर्षांपासून अत्यल्प पाऊस कोसळल्याने तालुका कोरड्या दुष्काळास सामोरे जात आहे.पाणीटंचाईमुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. गावाची तहान भागवणारे तलाव, विहिरी, बोअरवेल, हँडपंप कोरडे पडले आहेत. प्रशासनाकडे कायमस्वरूपी उपाययोजनांचे नियोजन नसल्याने महिलांना दोन किलोमीटर अंतराहून पाणी आणावे लागत आहे.पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या. मागणीप्रमाणे शासकीय टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. आणखी काही गावांमध्ये आगामी काळात टँकर पुरविले जातील. ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी वनवन थांबविण्यासाठी तहसीलने आराखडा बनविला आहे.- गणेश माळी,तहसीलदार, मोर्शी

टॅग्स :water shortageपाणीटंचाई