कत्तलीसाठी जाणाऱ्या २६ जनावरांना अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 11:58 PM2018-01-15T23:58:20+5:302018-01-15T23:59:08+5:30

अमरावती नागपूर महामार्गावर कारवाई करीत तिवसा पोलिसांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या २६ जनावारांसह ५७ गोवंशांना जीवदान दिले.

26 animals to be taken for slaughter | कत्तलीसाठी जाणाऱ्या २६ जनावरांना अभय

कत्तलीसाठी जाणाऱ्या २६ जनावरांना अभय

Next
ठळक मुद्देतिवसा पोलिसांची कारवाई

आॅनलाईन लोकमत
तिवसा : अमरावती नागपूर महामार्गावर कारवाई करीत तिवसा पोलिसांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या २६ जनावारांसह ५७ गोवंशांना जीवदान दिले. ही कारवाई तिवसा पेट्रोल पंपाजवळ सोमवारी करण्यात आली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. नव्या वर्षातील ही पहिली मोठी कारवाई आहे.
प्राप्त माहितीनुसार, नागपूर येथून अमरावती मार्गे जाणारा ट्रक क्रमाकं एचआर ७३/०९८५ मधून जनावरांची वाहतूक केली जात होती. माहिती मिळताच तिवस्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढोकने, पीएसआय शीतल खोब्रागडे यांच्यासह दीपक सोनारेकर, मिनेश खांडेकर, किसन धुर्वेसह यांनी तिवसा पेट्रोल पंप जवळ नाका बंदी केली. ट्रकला ताब्यात घेतले. ट्रकमध्ये ५७ जनावरे आढळून आली. यातील २६ जानावरे कत्तलीसाठी जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. नजीकच्या केकतपूर गोरक्षणा जनावरांना पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी शेख रईउद्दिन शेख राव उद्दिन (२८), सईद खान सफूर खान (३२), मो.अस्लम. मो अजगर (२७, तिघेही रा. विदिशा मध्यप्रदेश) यांना अटक करून त्यांच्यावर गोहत्या प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा नोंद केला.

Web Title: 26 animals to be taken for slaughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.