शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

दोन दिवसांत २५ हजार नागरिकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 5:00 AM

जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी अशा दोन विभागांमध्ये नागरिकांकडून आरोग्यविषयक माहिती गोळा करण्यासाठी २ ते ६ एप्रिल दरम्यान ही मोहीम राबविली जात आहे. अमरावती महानगरात गुरुवारी १४ पथकांद्वारे केलेल्या तपासणीत सुमारे आठ हजार नागरिकांच्या भेटी घेण्यात आल्यात. यात सर्दी, खोकला, ताप व श्वसनाच्या त्रासाची नोंदणी केली जात आहे.

ठळक मुद्देसर्दी, खोकला, ताप, श्वसनास त्रासाची नोंदणी : सकाळी ८ ते १२ दरम्यान भेटी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या आदेशान्वये ‘अमरावतीकर, मात करूया कारोनावर’ या गुरुवारपासून प्रारंभ झालेल्या विशेष मोहिमेत दोन दिवसांत २५ हजार २९४ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात सर्दी, खोकला, ताप व श्वसनाचा त्रास असल्याबाबत नोंदणी करण्यात येत आहे. महापालिकेचे आरोग्य पथक हे सकाळी ८ ते १२ दरम्यान नागरिकांच्या दारी पोहोचून एका प्रपत्रात ही माहिती गोळा करीत आहेत.जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी अशा दोन विभागांमध्ये नागरिकांकडून आरोग्यविषयक माहिती गोळा करण्यासाठी २ ते ६ एप्रिल दरम्यान ही मोहीम राबविली जात आहे. अमरावती महानगरात गुरुवारी १४ पथकांद्वारे केलेल्या तपासणीत सुमारे आठ हजार नागरिकांच्या भेटी घेण्यात आल्यात. यात सर्दी, खोकला, ताप व श्वसनाच्या त्रासाची नोंदणी केली जात आहे. गुरुवारी ७९३१ व शुक्रवारी २१ आरोग्य पथकांद्वारे १७ हजार ३६३ नागरिकांची शहरात तपासणी करण्यात आली आहे. कोरोना विषाणू संसर्गाने बाधित नेमकी नागरिकांची संख्या किती, हे तपासणी अहवालाअंती ६ एप्रिलनंतरच स्पष्ट होणार आहे. शहरातील नागरिकांची विशेष तपासणी मोहीम वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, स्वच्छता विभागप्रमुख डॉ. सीमा नैताम, समाजविकास अधिकारी धनंजय शिंदे यांच्या नेतृत्वात करण्यात येत आहे.पाच सदस्यांकडून तपासणीअमरावती व बडनेरा शहरात एकाच वेळी नागरिकांची विशेष तपासणी मोहीम राबविली जात आहे. एका पथकात पाच सदस्य आहेत. ते नागरिकांंसोबत चर्चा करताना सर्दी, खोकला, ताप, श्वसनाचा त्रास आहे का, अशी विचारणा करीत आहेत. या पथकात डॉक्टर, पोलीस, आशा वर्कर आणि दोन शिक्षकांचा समावेश आहे.आशा वर्कर आघाडीवरकोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात प्रारंभ झालेल्या नागरिकांच्या विशेष तपासणी मोहिमेत आशा वर्कर आघाडीवर आहेत. दारावर पोहोचताच नागरिकांच्या आजाराबाबतची माहिती आशा वर्कर गोळा करून शिक्षकांना नोंदी घेण्यासाठी मदत करतात. पथकातील डॉक्टर, दोन शिक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांशी त्यांचा समन्वय असल्याचे चित्र आहे.पहिल्या दिवशी नागरिकांची विशेष तपासणी मोहीम राबविताना थोडाफार त्रास झाला. मात्र, शुक्रवारी बहुतांश भागात आरोग्य पथकाला सहकार्य करून नागरिकांनी माहिती दिली. पुढे ६ एप्रिलपर्यंत असेच सहकार्य नागरिकांकडून अपेक्षित आहे. ही विशेष तपासणी मोहीम नागरिकांच्या हितासाठीच आहे.- प्रशांत रोडे,आयुक्त, महापालिका.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस