शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
4
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
5
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
6
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
7
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
8
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
9
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
10
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
11
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
12
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
13
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
15
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
16
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
17
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
18
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
19
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
20
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे

वनजमिनी वर्ग करण्यासाठी २५ अटी-शर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 22:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वनजमिनींचे भोगवटदार वर्ग २ मधून १ करतेवेळी आता २५ प्रकारच्या अटी-शर्ती लादण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या वने व पर्यावरण मंत्रालयाच्या परवानगीनंतरच वनजमिनींचे वर्ग करणे शक्य असेल, अन्यथा संंबंधित प्रादेशिक वनाधिकाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होतील, असे शासनाने स्पष्ट केले आहे.शासनाने १५ मे १९०८ रोजी जीआर जारी करून ...

ठळक मुद्देउपवनसंरक्षकांवर जबाबदारी : भोगवटदार वर्ग २ मधून १ करताना कागदपत्रे आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वनजमिनींचे भोगवटदार वर्ग २ मधून १ करतेवेळी आता २५ प्रकारच्या अटी-शर्ती लादण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या वने व पर्यावरण मंत्रालयाच्या परवानगीनंतरच वनजमिनींचे वर्ग करणे शक्य असेल, अन्यथा संंबंधित प्रादेशिक वनाधिकाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होतील, असे शासनाने स्पष्ट केले आहे.शासनाने १५ मे १९०८ रोजी जीआर जारी करून पाच एकरपर्यंत वनजमिनींचे वाटप करण्यासाठी प्रादेशिक वनसंरक्षकांचे ना-हकरत प्रमाणपत्र अनिवार्य केले होते. २९ मे १९७६ रोजी शासननिर्णय जारी करून वनजमिनींच्या वनेतर वापरासाठी राज्य मंत्रिमंडळाची मान्यता गरजेची केली होती. त्यानंतर २५ आॅक्टोबर १९८० ला वनसंवर्धन अधिनियम १९८० लागू झाला. त्यानुसार वनजमिनींचा वनेतर वापर करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी अनिवार्य झाली व आजही आहे. मात्र, गर्व्हमेंट ग्रॅन्ट्स अ‍ॅक्ट १८९५ मधील तरतुदीनुसार वनजमिनीचे वाटप, पट्टे हे नवीन अविभाज्य शर्तीवर केले आहे. वनजमिनी निर्वनीकरण झालेल्या नाही. त्यामुळे भारतीय वनअधिनियम १९२७ च्या कलम २३ नुसार फक्त वनजमिनी वारसदारांचे नावे करता येते. परंतु, महसूल विभाग, उपनिबंधक (नोंदणी) यांनी मूळमालक वनविभागाचे प्राधिकारी यांची पूर्वपरवानगी न घेता भोगवटदार वर्ग २ मधून १ वर्ग करण्याची किमया केली आहे. याप्रकरणी महसूल, उपनिबंधक नोंदणी, खरेदी-विक्री करणारे यांसह दोन साक्षीदार यांच्याविरुद्ध वनगुन्हे दाखल करणे गरजेचे आहे. मात्र, राज्यात १९७६ पासून वनजमिनींचे वर्ग करताना झालेला अपहार निखंदून काढण्यासाठी मंत्री, वरिष्ठ वन अधिकारी यापैकी कोणीही पुढाकार घेतलेला नाही.वनजमिनी वर्गसाठी ही लागतील कागदपत्रेतहसीलदारांकडून स्वामित्वाचा दाखला, गाव नमुना ६ उतारा, मंडळ अधिकारी साक्षांकित हद्दीचा नकाशा, सर्वे क्रमांकांची साक्षांकित यादी, ३० आॅगस्ट १९७५ रोजी धारण क्षेत्र १२ हेक्टरच्या आत असल्याचा तहसीलदारांचा दाखला, क्षेत्र पुर्नस्थापित असल्याबाबत खासगी वने उपजिल्हाधिकाऱ्यांचा दाखला, पहिले व दुसरे महायुद्धातील सैनिक वा अधिकारी यांना वाटप केलेले नाही याबाबत महसूल अधिकाºयाचा दाखला, क्षेत्र उभ्या झाडात मोडत नसल्याचे तालुका भूमिअभिलेख दाखला, सिंध व बांग्लादेशी निर्वासितांना वाटप नसल्याचा महसूल अधिकाºयांचा दाखला, राखीव अथवा संरक्षित क्षेत्र नाही, वन संज्ञेत अंतर्भूत नाही, गायरान क्षेत्र नसल्याचा भूमिअभिलेख अधिकाºयांचा दाखला, गाव नमुना जुना सर्वे क्रमांक अ, ब, क, ड आणि इ, जुने सर्वेनुसार नकाशा व गट नंबर नकाशा, महसूलचे मूळ वाटप आदेश, मंत्रिमंडळाची वाटपापूर्वीची परवानगी, महसूल, वन व भूमिअभिलेख विभागाची संयुक्त मोजणी शिट, सन १९८८ च्या सर्व्हे नंबरचा मूळ नकाशा व सन १८८२ चा गाव नकाशा, खरेदी- विक्रीसाठी हद्दिचे वनपालांचे बयाण आवश्यक आहे.वनजमिनींचे वर्ग २ मधून १ करणेसंदर्भात अद्याप एकही प्रकरण आले नाही. तसेही वनअधिनियमानुसार वनजमिनींचे वर्ग करता येत नाही. काही प्रकरणी अपवादात्मक तसे होते. मात्र, त्याकरिता नियमावलीने फायलींचा प्रवास होतो.- प्रवीण चव्हाणमुख्य वनसंरक्षक, अमरावती प्रादेशिक