शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांत २४ टक्के पाणीसाठा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 17:28 IST

पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांतील मोठे, मध्यम व लघु अशा एकूण ५०२ प्रकल्पांत सरासरी २४.९० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे.

ठळक मुद्देपश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांतील मोठे, मध्यम व लघु अशा एकूण ५०२ प्रकल्पांत सरासरी २४.९० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे. बुलडाणा व अमरावती जिल्ह्यातील सरासरी पाणीसाठ्याची स्थिती बिकट आहे. बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सर्वाधिक कमी ७ टक्केच पाणीसाठा आहे.

संदीप मानकर

अमरावती - पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांतील मोठे, मध्यम व लघु अशा एकूण ५०२ प्रकल्पांत सरासरी २४.९० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे. यामध्ये बुलडाणाअमरावती जिल्ह्यातील सरासरी पाणीसाठ्याची स्थिती बिकट आहे. परिणामी पुढील पावसाळ्यापर्यंत तीन महिने पाण्याचे नियोजन योग्यरीत्या जलसंपदा विभागासह संबंधित यंत्रणेला करावे लागणार आहे. 

बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सर्वाधिक कमी ७ टक्केच पाणीसाठा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात सिंचनाला देण्यात येणारे पाणी यापूर्वीच थांबविण्यात आले आहे. यंदा पाणीटंचाईची झळ नागरिकांना आतापासूनच जाणवू लागली आहे. विभागातील आठ मोठ्या प्रकल्पांत फक्त २५.४५ टक्के, २४ मध्यम प्रकल्पांत ३३.४२ टक्के, ४६९ लघु प्रकल्पांत फक्त १८.८९ टक्के अशा एकूण ५०२ प्रकल्पांत सरासरी २४.९० टक्के पाणीसाठा आहे. या प्रकल्पांचा प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा ३२९६.१६ दलघमी आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा ८२०.६३ दलघमी आहे. 

अमरावती जिल्ह्यातील एकूण ८५ प्रकल्पांत २६.३८ टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील १२० प्रकल्पांत सर्वाधिक ३४.२३ टक्के पाणीसाठा, अकोला जिल्ह्यातील ४६ प्रकल्पांत २६.३८ टक्के पाणीसाठा, वाशिम जिल्ह्यातील १४६ प्रकल्पांत २०.२६ टक्के पाणीसाठा, बुलडाणा जिल्ह्यातील १०५ प्रकल्पांत सर्वात कमी ७.२३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 

उर्ध्व वर्धा प्रकल्पात २२.९९ टक्के पाणीसाठा

विभागातील आठ मोठ्या प्रकल्पांत २५.४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये अमरावती शहराला पाणीपुरवठा करणारे उर्ध्व वर्धा धरणात २२.९९ टक्के पाणीसाठा शिल्लक  आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्पात ४६.६३ टक्के पाणीसाठा अरुणावती प्रकल्पात २९.३८ टक्के, बेंबळा प्रकल्पात २७.५४ टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात ३१.१६ टक्के, वान प्रकल्पात ५३.६२ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ११.३१ टक्के, पेनटाकळी प्रकल्पात सर्वात कमी  २.९५  टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी बुलडाणा जिल्ह्यांतील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासंदर्भात  चिंता वाढली आहे.

टॅग्स :WaterपाणीAmravatiअमरावतीbuldhanaबुलडाणा